पुणे

शॉर्ट फिल्म करणे आव्हानात्मक - नीना कुलकर्णी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - चित्रपटांप्रमाणेच शॉर्ट फिल्म करणे तितकेच आव्हानात्मक असते, असे मत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केले. 

लघुपटांमधील परिपूर्णता म्हणजेच उत्कृष्टता शोधण्यासाठी "रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्‍ट लार्ज शॉर्ट फिल्म्स'तर्फे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात दिग्दर्शक इम्तियाज अली, निरंजन अय्यंगार, मनीष रहाटकर, चित्रपट समीक्षक व पत्रकार अनुपमा चोप्रा आणि अभिनेत्री श्‍वेता बासू प्रसाद यांनी परिपूर्णतेची आपापली व्याख्या कथन केली. इम्तियाज अली यांचा "द अदर वे', नीना कुलकर्णी आणि विवान शहा यांची मुख्य भूमिका असलेला व निरंजन अय्यंगार दिग्दर्शित "मॉं' आणि श्‍वेता बसू प्रसाद हिची प्रमुख भूमिका असलेला मनीष रहाटकर दिग्दर्शित "व्हिसा' हे तीन लघुपट या कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आले. या कथालेखकांनी आपापल्या कथांमागील आपल्या प्रेरणास्थानाबद्दल उपस्थितांना  माहिती दिली. 

कुलकर्णी म्हणाल्या, की ""शॉर्ट फिल्ममध्ये कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत कथा पोचवायची असते. लिखित आहे, त्यापेक्षा जे अलिखित आहे ते दाखवायचे आव्हान यामध्ये असते. थोड्याशा वेळात खूप काही दाखवण्याचे आव्हान शॉर्ट फिल्ममध्ये असते. त्यामुळे मला शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्ममध्ये फरक करावा, असे वाटत नाही.'' 

इम्तियाज अली म्हणाले, ""चटणी' ही शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर सर्व प्रकारच्या कथांना शॉर्ट फिल्ममध्ये उत्तम प्रकारे हाताळता येऊ शकते, असे मला वाटले. त्यामुळे मी शॉर्ट फिल्ममध्ये नवीन आणि अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

श्‍वेता बासू प्रसाद म्हणाली, ""शॉर्ट फिल्म आधीपासून निर्मित होत असली, तरी त्याची लोकप्रियता डिजिटल माध्यमामुळे वाढत आहे. मोठ्या चित्रपटांचे जसे 100-200 कोटीचे क्‍लब असतात, तसेच शॉर्ट फिल्मकरिता 1 मिलियन, 2 मिलियन क्‍लब असा ट्रेंड येतोय. सध्या धावपळीच्या जगात, प्रवास करतानादेखील सहजरीत्या शॉर्ट फिल्म पाहण्याचा आनंद लोक घेऊ शकतात.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT