पुणे

स्ट्रॉबेरी झाली अधिक ‘गोड’

सकाळवृत्तसेवा

पुणे - लालसर आणि चवीला आंबटगोड असलेल्या स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात आला आहे. मार्केट यार्ड येथील फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने भावांत वाढ झाली आहे.

परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. सध्या हवामान पोषक असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले आहे. फळांचा आकार चांगला होत असून गोडीही वाढत आहे. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात स्ट्रॉबेरी हंगाम सुरू होतो. या वेळी हंगाम उशिरा सुरू झाला. सुरवातीला उत्पादन कमी असल्याने आवक मर्यादित होती. फळांचा आकारदेखील छोटा होता. आता आवक चांगली होऊ लागली आहे. तुलनेत मागणीही वाढल्याने स्ट्रॉबेरी ‘भाव’ खाऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीच्या प्रतिदोन किलोला १५० ते २०० रुपये भाव मिळत होता. बाजारात रविवारी (ता. १७) स्ट्रॉबेरीची सुमारे चार टन आवक झाली असून, या हंगामातील ही सर्वांत मोठी आवक आहे. त्यानुसार मागणीही वाढल्याने प्रतिदोन किलोला २०० ते ३०० रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. 

महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भिलार, जावळी आणि भोर तालुक्‍यातून आवक होत आहे. पुण्यातून हा माल गोवा आणि गुजरातला पाठविला जात आहे. त्याचप्रमाणे कोलकता, कर्नाटक, बंगळूर, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही मागणी वाढल्याचे मोरे यांनी नमूद केले. घरगुती ग्राहकांबरोबरच कॅंडी, आइस्क्रीम, पल्प, सिरप, जेली उत्पादक कंपन्यांकडून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर, स्वीट चार्ली आदी वाण उपलब्ध झाले असून, पुढील दोन महिने हंगाम चालण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT