Pune News Sakal
पुणे

Pune News : तळेगाव ढमढेरेची कन्या मोनाली जेधे झाली राज्य कर निरीक्षक

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मोनाली राजेंद्र जेधे यांची "राज्यकर निरीक्षक"पदी (एस टी आय) निवड झाली आहे

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मोनाली राजेंद्र जेधे यांची "राज्यकर निरीक्षक"पदी (एस टी आय) निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत मोनालीने विशेष यश संपादन केल्याने त्यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल तळेगाव ढमढेरे परिसरातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी मोनाली याचे अभिनंदन करून सत्कार केला.

मोनाली राजेंद्र जेधे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय ठाणे येथे झाले असून, ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात बीएससी केमिस्ट्री ही पदवी पूर्ण केली आहे. मोनालीचे वडील राजेंद्र विठ्ठल जेधे हे गुप्तचर विभागामध्ये अधिकारी आहेत. आई सुरेखा जेधे या गृहिणी आहेत. माझ्या लाडाच्या व अभ्यासू लेकीची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाल्याने आम्हाला व आमच्या नातेवाईकांना अत्यंत आनंद झाला आहे असे मोनालीची आई व वडिलांनी मत व्यक्त केले आहे.

तसेच साडेतीन वर्षांपूर्वी तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी कुटुंबातील नारायण विलास ढमढेरे यांच्याबरोबर मोनालीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बहुतांश मुलींचे शिक्षण सासरी आल्यानंतर बंद होते, परंतु सौ मोनाली नारायण ढमढेरे यांच्या सासू विजया विलास ढमढेरे व सासरे विलास सुदाम ढमढेरे यांनी आपल्या सुनेला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रोत्साहन व प्रेरणा दिली. सासू - सासऱ्याने दिलेल्या प्रेरणेमुळे मोनालीने पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यकर निरीक्षकाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये मुख्य परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली. पुढील काळात राजपत्रित अधिकारी होण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोनालीने सकाळशी बोलताना सांगितले.

स्पर्धा परीक्षेसाठी १०- १० तास अखंडित अभ्यास करून जिद्दीने हे यश मिळवले आहे. माझे आई - वडील, सासू-सासरे व पती यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनाने मी या यशापर्यंत पोचली असल्याचे सौ.मोनाली नारायण ढमढेरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT