पुणे

डॉ. लागू यांनी घेतली तावडेंची "विकेट' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "नमस्कार, मी सांस्कृतिक मंत्री, विनोद तावडे.' अशा शब्दांत विनोद तावडे, स्वतःची ओळख करून देत होते, भारतीय चित्रपटसृष्टी व रंगभूमीवरील अनभिषिक्त "नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू यांना. कसलेले कलावंत असलेल्या डॉ. लागू यांनीही "अहो, राजकारणाशी माझा काही संबंध नाही.' अशा नर्मविनोदी शैलीत "गुगली' टाकली. त्यावर "सिंहासन', "मुक्ता' यांसारख्या राजकारणावरील चित्रपटांमधील डॉ. लागू यांचा अभिनय आठवत तावडे यांनी "तुमच्या भूमिका पाहूनच मी राजकारणात आलो', असे वाक्‍य उच्चारले. कला व राजकारणाच्या प्रांतातील दोन मोठ्या व्यक्तींमधील संवाद ऐकणाऱ्या पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्या दोघांनाही दाद दिली. 

साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांवर आधारित 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या "सिंहासन' या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक यांच्याबरोबर डॉ. लागू यांनी "अर्थमंत्री विश्‍वासराव दाभाडे' ही भूमिका साकारली होती. एखाद्या कसलेल्या राजकीय नेत्यासारखा डॉ. लागू यांनी अभिनय केला होता. ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेषतः सांस्कृतिकमंत्री तावडेही त्याला अपवाद नाहीत. 

सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे यांनी तशी कबुली दिली. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासमवेत तावडे यांचे सभागृहात आगमन झाले. त्या वेळी सभागृहाच्या पहिल्याच रांगेत बसलेल्या डॉ. लागू व त्यांच्या पत्नी दीपा यांच्याकडे त्यांची पावले वळली. दोघांनाही नमस्कार करत तावडे यांनी डॉ. लागू यांनी स्वतःची ओळख करून दिली. तेव्हा डॉ. लागू यांनी आपल्या नर्मविनोदीशैलीत त्यांची फिरकीही घेतली. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेल्या तावडे यांनीही डॉ. लागू यांच्या फिरकीला "राजकीय' उत्तर दिले. डॉ. लागू व तावडे या दोघांचा काही क्षण चाललेल्या संवादाचा भांडारकर, अमरापूरकर कुटुंबीय व सभागृहातील प्रेक्षकांनीही मनसोक्त आनंद घेतला.

डॉ. लागू यांना शुभेच्छा 
डॉ. लागू हे 16 नोव्हेंबरला नव्वदीमध्ये पदार्पण करत आहेत. त्याचे औचित्य साधून तावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी दोघांमध्ये चांगलाच हास्यविनोद झाला. आपल्या भाषणामध्ये हाच धागा पकडून तावडे यांनी पुन्हा एकदा डॉ. लागू यांना शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी सभागृहामध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून डॉ. लागू यांना शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT