pmc
pmc sakal
पुणे

Pune : पथदिवे आदलाबदलीच्या उठाठेव्यांमुळे साडे दहा लाखाचा भूर्दंड

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महापालिकेने वीज बचत करण्यासाठी ‘महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) सोबत करार केलेला आहे. मात्र, महाप्रितकडून नवे पथदिवे उपलब्ध झालेले नसतानाही विद्युत विभागाने पथदिवे बदलण्याचे उठावेवे सुरू केले आहेत. त्यामुळे सिंहगड रस्ता व सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चालू स्थितीत असलेले साडे तीन हजार पथदिवे बदलल्याने महापालिकेला साडे दहा लाख रुपयांचा भूर्दंड पडणार आहेत.

पुणे महापालिकेच्या वास्तू, मैलापाणी प्रकल्प, जलशुद्धिकरण प्रकल्प, पथदिवे यासह इतर ठिकाणी वर्षभरात २९.१० कोटी वीज युनिट वीजेच्या वापरासाठी १५३ कोटी रुपये वीज बिल भरावे लागत आहे. या वीज बिलात बचत झाल्यास त्यातील ८० टक्के रक्कम ‘महाप्रित’ला तर २० टक्के रक्कम महापालिकेला मिळणार आहे.

शहरात एकूण १ लाख ८० हजार पथदिवे आहेत. त्यातील ९० हजार पथदिव्यांवर टाटा कंपनीचे फिटिंग (दिवे) आहेत. आणखी पाच वर्ष या कंपनीकडे हे दिवे आहेत. तर उर्वरित ९० हजार पथदिव्यांची देखभाल महापालिका करत असून,

हे पथदिवे महाप्रितच्या ताब्यात दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालय आणि सहकानगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणारे प्रत्येकी १० हजार पथदिवे ‘महाप्रित’कडे दिले जाणार आहेत. पण सध्या या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ३५०० ‘टाटा’ कंपनीचे फिटिंग काढण्याचे काम सुरू झाले आहे.

महाप्रितचे दिव्यांसाठी महिन्याभराची प्रतिक्षा

महाप्रिततर्फे या भागातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले केले असले तरी दिल्ली येथील एका त्रयस्थ संस्थेमार्फत तपसाणी करून घेतल्यानंतर दिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवे लावण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. पण विद्युत विभागाने टाटा कंपनीचे दिवे काढून घेण्यास सुरवात केली आहे.

तेथे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जुने दिवे आणून बसविले जात आहेत. एक दिवा काढून तो बसविण्यासाठी ठेकेदाराला ३०० रुपये द्यावे लागणार आहेत.

पण पुन्हा एका महिन्याने हे दिवे काढून टाकावे लागणार आहेत. म्हणजे एकच काम दोन वेळा करावे लागणार आहे. पण यासाठीचा ठेकेदाराला साडे दहा लाख रुपयांचे द्यावे लागणार असल्याचे विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चांगले दिवे काढून बंद दिवे लावले

धायरी प्रभाग क्रमांक ३३ मध्ये टाटा कंपनीचे दिवे काढल्यानंतर तेथे दुसरे दिवे लावले. पण हे दिवे बंद असल्याचे असल्याचे समोर आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी परत सुरू असलेले दिवे लावले.

‘‘महापालिकेने धायरीतील सुमारे ५५० दिवे बदलले आहेत. त्यातील काही ठिकाणचे दिव बंद आहेत. चालू दिवे काढून बंद दिवे का काढले जात आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तरी त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. याची चौकशी केली पाहिजे.’’

- महेश पोकळे, विभाग प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

‘‘सहकानगर व सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महाप्रितचे फिटिंग बसविले जाणार असल्याने येथील टाटा कंपनीचे फिटिंग काढून ते ढोलपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बसविले जात आहेत. महाप्रितचे दिवे येण्यास आणखी काही दिवसांच लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बिबवेवाडी येथील ३५०० दिवे सहकारनर, सिंहगड रस्ता भागात लावले जाणार असून, यासाठी ठेकेदाराला प्रति फिटिंग ३०० रुपये दिले जाणार आहेत. हे सर्व दिवे सुरू आहेत, तसेच महापालिकेचे नुकसान नाही.’’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता विद्युत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT