Pune : भिक्षेकरी मुलांना कैलाश सत्यार्थी 'चिल्ड्रन फाऊंडेशन'च्या कार्यकर्त्यांनी दिले ABCDचे धडे

त्या मुलांना बाल मित्र मंडळाच्या मुलांनी अभ्यास शिकवला.त्यांना abcd, 1234, कविता, प्रार्थना इत्यादी मूलभूत गोष्टी शिकवल्या. त्या मुलांची माहिती घेतली.
pune
punesakal

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - फूटपाथवर राहणाऱ्या, भीक मागणाऱ्या, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या शाळाबाह्य मुलांना अक्षरओळख करून देऊन, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा अभिनव उपक्रम कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनच्या बाल मित्र मंडळातर्फे सुरू करण्यात आला.

गेल्या एक वर्षापासून विश्रांतवाडी परिसरातील 4 समुदायांमधील मुलांशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी ही संस्था काम करत आहे. या बाल मित्र मंडळमधील मुलांनी "बॅग-पॅक हिरो" हा एक उपक्रम घेण्याचे ठरवले.

pune
Pune : पुण्यात अनर्थ टळला, आयटी बिझनेस हबमधे आग; सुरक्षा रक्षक, फायर ब्रिगेडच्या जवानांमुळे दोन हजार कर्मचारी सुखरुप बाहेर

या उपक्रमात त्यांनी खाऊसाठी लागणारे पैसे खर्च न करता ते साठवले आणि थोडे शालेय साहित्य खरेदी करून ते सिग्नलच्या ठिकाणी गेले. जिथे लहान मुले भीक मागतात, फूटपाथवर राहतात, आर्थिक अभावामुळे शाळेत जात नाहीत, त्या ठिकाणी जाऊन

त्या मुलांना बाल मित्र मंडळाच्या मुलांनी अभ्यास शिकवला.त्यांना abcd, 1234, कविता, प्रार्थना इत्यादी मूलभूत गोष्टी शिकवल्या. त्या मुलांची माहिती घेतली.

pune
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

ही माहिती जवळच्या पोलीस ठाणे, शाळांमध्ये जमा करुन त्या मुलांची शिक्षणासाठी नोंदणी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

बालमित्र मंडळातील ही मुले शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहत असून आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत नसूनदेखील ते असे बॅग पॅक सुपरहिरो बनले आहेत. त्यांचे हे कार्य इतरांनी आदर्श घेण्यासारखे आहे, असे या मुलांच्या मार्गदर्शक मयूरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com