Pune
Pune sakal
पुणे

Pune : आंबेगाव जुन्नर विभागातील प्रलंबित दावे; विशेष लोक अदालतद्वारे निकाली काढणार

डी. के. वळसे पाटील

मंचर - “महसूल विभागात अनेक दावे प्रलंबित आहेत. वादी व प्रतीवादी असे दोन्ही पक्षकार एकमेकांच्या जवळचे नातेवाईक किंवा जवळ राहणारे आहेत. त्यांच्यामध्ये समझोता झाल्यास मानसिक त्रासाप्रमाणेच वेळ व पैसा वाचेल.

पूर्वीसारखे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. त्यासाठी पक्षकारांनी समजूतदारपणा दाखवून सदर दावे निकाली काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.”असे आवाहन जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे केले आहे.

जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाने मंचर (ता.आंबेगाव) येथील प्रांत कार्यालयात गुरुवारी (ता.११) आयोजित केलेल्या विशेष लोक अदालतीचे उद्घाटन दीपप्रज्वालनाने शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जुन्नरचे तहसीलदार रविंद्र सबनीस, आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ, प्रभारी तहसीलदार ए.बी गवारी, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे,

जेष्ठ विधी तज्ञ अँड.मारुती ठोंबरे, जुन्नर बार असोसिएशन अध्यक्ष अँड.अरुण गाडेकर, अँड.नवनाथ गावडे, अँड.प्रमोद काळे, उपस्थित होते. २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे प्रामुख्याने निकाली काढण्यासाठी ६९० दाव्यांविषयी पक्षकारांमध्ये समुपदेशन करण्याचे काम अधिकारी व कर्मचार्यांनी केले. सबनीस यांनी लोक अदालतमध्ये सहभागी झालेल्या पक्षकारांचे स्वागत केले.

“लोक अदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना लवकर न्याय मिळत आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.” असे अँड. गाडेकर यांनी सांगितले. कार्यक्रम सुरु असतानाच आळे (ता.जुन्नर) येथील अरुण खंडू शेजवळ व ललिता अरुण शेजवळ यांचा व दर्शन प्रभाकर शेजवळ यांच्यामध्ये वारस नोंदीसाठी वाद होता.

पण अरुण शेजवळ यांनी अर्ज माघारी घेऊन वाद मिटल्याचे जाहीर केले.त्याबद्दल अरुण शेजवळ दांपत्यांचा सन्मान शिंदे यांच्या हस्ते गुलाबाची फुले देऊन करण्यात आला. दिगंबर उगले, मंगला दाभाडे, राहुल नलावडे, राहुल खैरनार, मनोज डोके यांनी समुपदेशन केले. शेळकंदे यांनी आभार मानले.

मंचर (ता.आंबेगाव) प्रांत कार्यालयात झालेल्या विशेष लोक अदालतीत वारस वाद मिटल्याचे जाहीर केल्याबद्दल अरुण शेजवळ दांपत्यांचा सन्मान जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे (डावीकडून दुसरे) यांच्या हस्ते करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT