Mumbai : सीप्झच्या सीएफसीचे काम गोदरेज इंटिरिओकडे

केंद्रात छोट्या आणि मध्यम उद्योजकांना तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या सोयी नाममात्र दरात मिळतील.
Seepz CFC work to Godrej Interio Modern technology Jewelery manufacturers Ministry of Commerce mumbai
Seepz CFC work to Godrej Interio Modern technology Jewelery manufacturers Ministry of Commerce mumbaisakal

मुंबई : सीप्झमधील सामायिक सुविधा केंद्राच्या अंतर्गत सोयींच्या निर्मितीचे काम गोदरेज अँड बॉयसचा फर्निचरनिर्मिती विभाग असलेल्या गोदरेज इंटिरिओला मिळाले आहे. सीप्झमधील दागिने उत्पादकांना त्यांच्या कामात आणि सर्व बाबतीत सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले मोठे सामायिक सुविधा केंद्र उभारण्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले आहे.

त्याच्या इंटिरियर कामाचे कंत्राट गोदरेज इंटिरिओला मिळाले आहे. या केंद्रात छोट्या आणि मध्यम उद्योजकांना तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या सोयी नाममात्र दरात मिळतील. या केंद्राचे काम १३१ दिवसात पूर्ण केले जाईल. सिप्झ मधून भारताच्या एकूण दागिने निर्यातीच्या ३१ टक्के दागिने निर्यात केले जातात. या केंद्रातील सारे अंतर्गत काम, सिव्हील वर्क, कामाच्या जागा, अग्नीशामन यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था असे काम केले जाईल असे, गोदरेज इंटरिओ चे वरिष्ठ उपाध्यक्ष स्वप्निल नगरकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com