PUNE-PCMC-Slum Aera
PUNE-PCMC-Slum Aera 
पुणे

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण जलदगतीने होणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन गतीने व्हावे, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध योजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 448 झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण करून पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून एका एजन्सीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील झोपडपट्ट्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. झोपडपट्ट्यांचा विकास गतीने व्हावा, यासाठी प्राधिकरणाकडून विविध उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्राधिकरणाकडून हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या एखादी झोपडपट्टी विकसित करण्यासाठी विकसक पुढे येतो. तेव्हा प्राधिकरणाकडून संबंधित झोपडपट्टीतील पात्र आणि अपात्र धारकांची यादी निश्‍चित केली जाते. त्यास लागणार विलंब आणि त्यातून होणारे वाद यामुळे अनेकदा प्रकल्प राबविण्यात उशीर होतो. त्याऐवजी आता प्राधिकरणानेच शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आहे. 

यापूर्वी प्राधिकरणाकडून पाच वर्षात केवळ 65 झोपडपट्ट्यांमधील 17 हजार 500 झोपड्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले होते. आता मात्र त्यासाठी तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी 95 झोपडपट्ट्यांतील झोपडीधारकांचे, त्यानंतर पुढील वर्षी 174 झोपडपट्ट्यांचे, त्यानंतर शेवटच्या टप्प्यात 189 झोपडपट्ट्यांचे असे तीन वर्षांत एकूण 448 झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

सर्व्हेक्षण करण्यामागचा हेतू 
-पात्र- अपात्र झोपडीधारकांची माहिती जमा होणार 
-नेमके किती झोपडीधारकांचे पुनर्वसन करावयाचे आहे, याचा आकडा निश्‍चित होणार 
-विकासकाकडून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तातडीने मान्यता देणे शक्‍य होणार 
-केंद्र व राज्य सरकार, महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचेही सर्व्हेक्षण होणार 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झोपडीधारकांना काय फायदा होणार 
-झोपडीधारकांना आयडी प्रूफ मिळणार 
-पुनर्वसनाच्या कामाला गतीने येणार 
-पुनर्वसन योजनेतून डावलले जाण्याची शक्‍यता संपुष्टात येणार 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्या आणि झोपडीधारकांचे सर्व्हेक्षणाचे काम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. पुढील तीन वर्षात हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणातून पात्र- अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तातडीने विकसकाला तातडीने मंजुरी देणे यामुळे शक्‍य होणार आहे. 
राजेंद्र निंबाळकर ( मुख्य अधिकारी, एसआरए) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT