pmpbus  file pic
pmpbus file pic 
पुणे

नादुरुस्त ‘पीएमपी’ने प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपी) भाडेतत्त्वावरील नादुरुस्त बसचा प्रवाशांना फटका बसत आहे. या गाड्या वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

भाडेतत्त्वावरील बसच्या महापालिका बस स्थानकातून शहराच्या विविध भागांमध्ये दररोज ५० ते ५५ फेऱ्या होत असतात. त्यातील अनेक बस ऐनवेळी बंद पडतात. तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत चालक वेळेवर बस आणत नाहीत. त्यामुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे पीएमपीचे वेळापत्रक कोलमडत असून, त्याचा भार महामंडळाच्या बसवर पडत आहे. डेपोतील कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही ठेकेदारांकडून चांगल्या बस मिळत नाहीत. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसवरील बेशिस्त चालकांची मुजोरी थांबविण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

याबाबत प्रवासी माया शेळके म्हणाल्या, ‘‘बस ठेकेदारांच्या असोत की पीएमपीच्या; त्यातील मोडकळीस आलेल्या खिडक्‍या, खुर्च्या तसेच, स्वयंचलित दरवाजे यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. गर्दीत बसमध्ये चढताना दरवाजा बंद असल्यास प्रवासी अडकून त्यांना इजा होण्याचे प्रकार घडले आहेत.’’

‘‘बंद पडणाऱ्या बसमुळे फेऱ्या कमी होतात. ‘पीएमपी’ प्रशासनाने बसची संख्या वाढवायला हवी. बसची संख्या वाढल्यास प्रवाशांची धावपळ कमी होईल,’’ असे प्रवासी रोहित इंदुलकर यांनी सांगितले.

ठेकेदारांच्या बसमुळे पीएमपीचे संतुलन बिघडले आहे. त्यांच्या चालकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. ठेकेदारांच्या बसमधून पुरेसे उत्पन्नही मिळत नाही.  
- काशिनाथ तेलंगे,  कर्मचारी, महापालिका बस स्थानक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT