priydarshan sahastrabuddhe
priydarshan sahastrabuddhe Sakal
पुणे

जागतिक स्तरावरील ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंजच विजेतेपद पुणेकराने पटकावले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हरित अर्थव्यवस्थेसाठी कार्यरत पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या ‘वायु’ उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवत त्यांनी २० हजार अमेरिकन डॉलरचा निधी प्राप्त केला आहे. प्रियदर्शन यांनी अभियांत्रिकीचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) येथून पूर्ण केले आहे.

अमेरिकेतील अशोका चेंजमेकर्स यांच्या वतीने आणि एचएसबीसी बँक यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत जगभरातील एकूण १२ संकल्पांना विजेते ठरवण्यात आले आहे. जगभरातून ३४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल गेल्या आठवड्यात अशोका चेंजमेकर्सच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला. पुढील संशोधनासाठी हा निधी देण्यात आला आहे. वायु या उपकरणाबद्दल माहिती देताना प्रियदर्शन म्हणाले,‘‘संपुष्टात येत असलेल्या खनिज इंधनांना पर्याय विकसित करून सामान्य माणसाच्या हातात ऊर्जानिर्मितीची ताकद द्यावी, या उद्देशाने वायु बायोगॅस तंत्रज्ञान उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.

वायु हे एक बायोगॅस उपकरण आहे ज्यामध्ये प्रामुख्याने घरातील ओला कचरा (प्रामुख्याने उरलेले अन्न) जिरवित मिथेन वायू निर्माण केला जातो. तयार झालेला मिथेन वायू हा पाईपलाईनद्वारे स्टोव्हला जोडला जातो. विशेष म्हणजे यावर सर्व प्रकारचे अन्न शिजविणे शक्य आहे.’’ या उपकरणाद्वारे दिवसाच्या अडीच टन कचऱ्यातून तीन हजार सिलींडर इतका गॅस वाचतो. तसेच त्यातून १२५ टन जीवाश्म कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखता येते, असे प्रियदर्शन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT