Property Card
Property Card 
पुणे

पुणे : ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला आता महत्त्वाचा पुरावा असलेला प्रॉपर्टी कार्ड लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भातील नियमावली अंतिम झाली असून, लवकरच मंत्रिमंडळासमोर याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

व्हर्टिकल इमारतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाने तयार केला होता. मुख्य प्रॉपर्टी व्यतिरिक्त प्रत्येक सदनिकाधारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याची शिफारस त्यामध्ये केली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी भूमी अभिलेख विभागाने मध्यंतरी पाठविला होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास राज्य सरकारकडून तत्त्वतः: मान्यता मिळाली. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार केली होती.

त्यावर दोन वर्षांपूर्वी नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या होत्या. शंभरहून अधिक हरकती या प्रस्तावावर दाखल झाल्या आहेत, त्यांची सुनावणी घेऊन नियमावली अंतिम करण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी ती राज्य सरकारकडे पाठविली होती. मात्र, त्या नियमावलीत राज्य सरकारच्या न्याय व विधी विभागाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने नियमावलीत दुरुस्ती करून पाठविली होती. तसेच, कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक बदलदेखील या नियमावलीत झाले. परंतु, कोरोनामुळे या नियमावलीचे काम थांबले होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात यासंदर्भात मुंबईमध्ये बैठक झाली. नियमावलीत आवश्‍यक त्या दुरुस्त्या करून त्यास अंतिम स्वरूप दिले आहे. लवकरच हा प्रस्ताव आता मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तसेच, भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला. त्यामुळे लवकरच ही योजना अमलात येण्याची शक्यता आहे.

- सध्याच्या पद्धतीमुळे काय होते
सदनिकांचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाच दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मात्र, गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंटची नोंद असते. तसेच, सर्व सदनिकाधारकांची एकत्रित नावे त्यावर असतात. त्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले, तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपर्टी कार्ड नोंदविण्यात येतो. बोजा नोंदविण्यात येत असल्याने काही वेळेस त्याचा त्रास बाकीच्या सदस्यांनाही सहन करावा लागतो.

- स्वतंत्र कार्डानंतर काय होणार
एखाद्या गृहप्रकल्पातील अथवा सोसायटीतील ज्या सदनिकाधारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल, त्याची नोंद पुरवणी प्रॉपर्टी कार्डवर घेतली जाईल. प्रत्येक सदनिकांचे प्रॉपर्टी कार्ड वेगळे मिळणार असल्याने कोणत्या सदनिकेवर कर्ज आहे, याचा मालक कोण, यापूर्वीचे मालक, त्यांचे नेमके क्षेत्रफळ, अन्य स्वरूपात बोजा असल्यास त्या सर्वांची नोंद कार्डावर होईल. यामुळे खरेदीदार व्यक्तीला माहिती मिळणार असल्यामुळे त्यांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे.

- काय फायदा?
प्रॉपर्टी कार्ड हे महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहे. प्रॉपर्टी कार्डवर सर्वच जागेची आणि सदनिकेच्या नोंदी असणार आहे. तसेच, त्यांचे जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. सदनिकेची खरेदी-विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहेत. एकाच सदनिका वेगवेगळ्या बॅंकेकडे गहाण ठेऊन त्यावर कर्ज उचलण्याच्या प्रकारालाही आळा बसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT