पुणे स्टेशन - प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सरकते जिने नुकतेच कार्यान्वित झाले. राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्याच्या बाजूने प्रवेश करताना प्रवाशांना हे जिने वापरता येतील.
पुणे स्टेशन - प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सरकते जिने नुकतेच कार्यान्वित झाले. राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्याच्या बाजूने प्रवेश करताना प्रवाशांना हे जिने वापरता येतील. 
पुणे

पुणे रेल्वे स्थानकामध्ये सरकते जिने कार्यान्वित

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सरकते जिने (एक्‍सलेटर) नुकतेच कार्यान्वित झाले. रेल्वे स्थानकावर आणखी तीन सरकते जिने महिन्यात कार्यान्वित होणार आहेत.

राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्यावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी या जिन्यांचा वापर करता येईल. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वर जाण्यासाठी तसेच तेथून बाहेर पडताना बहुतेक प्रवासी रेल्वे स्थानकाच्या मागील जिन्याचा वापर करतात. त्याच बाजूला दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा तळ आहे. त्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारवरून प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. सध्या तेथून दररोज सुमारे ५०-६० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी हे सरकते जिने उपयुक्त ठरतील, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले. 

रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला दोन्ही सरकते जिने जोडण्यात आले आहेत. आरक्षण केंद्राजवळही दोन सरकते जिने उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या शिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक दोन जवळही एक सरकता जिना उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. 

हे तिन्ही सरकते जिने उभारण्याचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी सरकते जिने सुरू राहण्यासाठी ‘जनरेटर’ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२ लाख - पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची दररोजची संख्या
२१८ - लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT