Rain Electricity supply 
पुणे

Pune Rain: पुण्यातील नागरिकांना पावसाचा 'झटका'; सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

Pune Rain Electricity supply to customers off: आंबेगाव तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंचाळे खुर्द व वचपे या गावामध्ये भूस्खलन होत आहे. तेथील नागरिकांचा स्थलांतर करण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

Pune Rain Update: संततधार पाऊस व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुणे, पिंपरी शहर तसेच खेड, मावळ व आंबेगाव तालुक्यातील सुमारे ३०५० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून ठेवण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीपात्राच्या परिसरातील डेक्कनमधील पुलाची वाडी व प्रेमनगरातील १००, सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील ७ सोसायट्यांचे ४५०, बालेवाडीमध्ये भीमनगरातील १००, विश्रांतवाडीमध्ये शांतीनगर व इंदिरानगरातील ४००, मंगळवार पेठमध्ये जुना बाजार परिसरातील ४५० तसेच ताडीवाला रोड परिसरातील ४५० अशा अशा सुमारे १९५० वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पिंपरीमध्ये संजय गांधीनगर व पिंपरी कॅम्पमध्ये ४०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.तसेच वीजयंत्रणा पुराच्या पाण्यात गेल्याने मावळ तालुक्यातील वडिवळे, वळख, बुधावाडी, सांगिसे, नेसावे, खांडशी आणि खेड तालुक्यातील साकुर्डी, कहू, वेताळे, सायगाव कोठुळे येथील सुमारे ७०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंचाळे खुर्द व वचपे या गावामध्ये भूस्खलन होत आहे. तेथील नागरिकांचा स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वीजसुरक्षेच्या दृष्टीने तेथील सुमारे १५ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

पुण्यामध्ये कालपासून पावासाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. हवामान विभागाने आज पुण्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला होता. याशिवाय धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ज सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी एकतानगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, यावेळी नागरिकांना दुसरीकडे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT