Pune
Pune  esakal
पुणे

Pune : हडपसर-मांजरी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कृष्णकांत कोबल

हडपसर : प्रभात फेरी, भारतमातेचा जयघोष, झेंडावंदन, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम, व्याख्याने, खाऊ वाटप आदी विविध उपक्रमांनी परिसरातील शाळा महाविद्यालये व संस्था संघटनांकडून अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मांजरी फार्म येथील जिल्हापरिषद शाळेतील विदयार्थ्यांनी परिसरातून प्रभातफेरी काढली होती. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अरुण झांबरे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार मोळकिरे होते. विद्यार्थ्यांनी यावेळी ध्वजगीत, समूहगीते, देशभक्तीपर गीते सादर करून मनोगतेही व्यक्त केली. मुख्याध्यापक किशोर कांबळे, स्वाती वनकुद्रे, कवयित्री श्रुती पवार व अनुराधा पारवे यांच्यासह पालक उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात प्राचार्या  डॉ. अश्विनी शेवाळे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील व महात्मा फुले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन  भारद्वाज यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी "पाणी वाचवा, इंधनाचा कमीत कमी वापर, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण' यावर पथनाट्य सादर केले. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. योगेश काक्रंबे व प्रा. निकिता रुखे यांनी संयोजन केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर विधानसभा मतदारसंघ माळवाडी शाखा व पंचशील मित्र मंडळाच्या वतीने भैरवनाथ चौकात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. शहर आरपीआयचे उपाध्यक्ष संतोष खरात तसेच, सुखदेव कांबळे, सोमनाथ लोंढे, विश्वनाथ शिरसाट, गणेश जाधव, तुषार बिनवडे, दत्ता पिसाळ, चंदू लोंढे, गणेश सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.

मांजरी येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावठाणात कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ मस्के यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. जीवन गाडे, अजय घुले, बालाजी गायकवाड, नजीर शेख, गणेश ननवरे, एकनाथ रोकडे व विश्वास ढेकणे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, पदाधिकारी ओंकार अंकुशे, पृथ्वीराज मस्के, रियाज अन्सारी, अभय पाटील, संजय देवरे व इतर दिव्यांग सभासद यावेळी उपस्थित होते‌. माजी सदस्य कैलास घुले, उद्योजक संतोष घुले व जीवन गाडे यांनी संयोजन केले.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात कर्नल समीर कुलकर्णी यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. लेखा परीक्षक मच्छिंद्र कामठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. महाविद्यालयातील छात्रसैनिकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच, शानदार संचलन व प्रात्यक्षिके केली. सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संचलनासाठी निवड झालेल्या गोल्डन एसयुओ आबुतराव तांबोळी व तुषार अडसूळ या छात्र सैनिकांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयास जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोरपडे व डॉ. नीता कांबळे यांचासत्कार करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला तसेच उत्कृष्ट राज्यस्तरीय सदिच्छा दूत पुरस्कार निकिता सालगुडे या विद्यार्थिनीला मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, कॅप्टन डॉ. धीरजकुमार देशमुख, प्रा. अनिल दाहोत्रे, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे उपस्थित होते. मांजरी बुद्रुक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश घुले यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. माजी जिल्हापरिषद सदस्य नंदकुमार घुले, प्राचार्य डॉ. रितेश पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल प्रा. केतन डुंबरे यांनी संयोजन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT