विद्यार्थांनी
विद्यार्थांनी  sakal
पुणे

Pune : नारायणगाव केंद्रात सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेस विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रवींद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव केंद्रात येथील गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यालयाच्या प्रांगणात आज (ता.२२) घेण्यात आलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेस विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ५०७ विद्यार्थांनी भाग घेतला.ब गटात( इयत्ता तिसरी, चौथी) सर्वांत जास्त १७३ विद्यार्थांनी भाग घेतला. गटनिहाय सहभागी विद्यार्थांनी काढलेल्या चित्रांची संख्या पुढील प्रमाणे: गट अ : १३९, गट ब : १७३, गट कः १३७, गट ड :५८ विद्यार्थांनी चित्र रेखाटताना प्रामुख्याने

मास्क आणि मी, वाढदिवसाचा केक ,फिश टॅंक मधील मासे, बागेतील दृश्य, मिरवणुकीसाठी सजवलेला घोडा , क्रिकेटचा सामना , मी लस घेतली हे दाखवणारा मुलगा किंवा मुलगी ,पाण्याखालची जीवसृष्टी या चित्रांना जास्त पसंती दिली. स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ कला शिक्षक सुनील रोकडे, अरविंद घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडिअम स्कूलच्या पर्यवेक्षिका वैशाली चतुर, स्मिता मंडलिक,उज्वला बोथरा, प्रतीक्षा पवार आदी उपस्थित होते

स्पर्धेत सबनीस विद्यालय, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडिअम स्कूल, एस. आर. केदारी बालक विद्यामंदिर नारायणगाव, व परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रसंचालक रवींद्र पाटे, अनुपमा पाटे, मुख्याध्यापिका अनुराधा पुराणीक, अनघा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिक्षक एस. आर. रोकडे, अरविंद घोलप, शंकर केंगले,पराग छलारे , संतोष खुडे, कावेरी निंबाळकर, सुप्रिया ओरसे, ज्योतीप्रभा जोरी, कर्मचारी गणेश माळी, मंदा जाधव यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.सुत्रसंचालन अनुपमा पाटे यांनी केले.

अदिती गायकवाड( विद्यार्थीनी इयत्ता आठवी ): दैनिक सकाळचा हा उपक्रम स्तुत्य आहे.आम्ही विद्यार्थी दरवर्षी चित्रकला स्पर्धेची वाट पहात असतो.चित्र रेखाटताना खूप आनंद मिळतो. चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT