पुणे- सातारा रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग.
पुणे- सातारा रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग.  
पुणे

सातारा महामार्गावरील ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष (व्हिडिओ)

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शेकडो अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगच्या विळख्यात प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत होर्डिंगचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारण्यासाठी संबंधित व्यावसायिक कोणाचीही परवानगी घेत नाहीत. सुमारे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात पुणे-सातारा रस्त्यावरील सुमारे वीस अनधिकृत होर्डिंग कोसळले होते. त्यानंतरही या होर्डिंगवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

शिंदेवाडी ते नसरापूरदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोनशे अनधिकृत होर्डिंग असल्याचे आढळून आले. हे होर्डिंग उभारताना प्रथम संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, हे होर्डिंग व्यावसायिक अशा प्रकारची कोणतीही परवानगी घेत नाहीत. पुणे-सातारा रस्त्यावरील सुमारे वीस अनधिकृत होर्डिंग सुमारे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात कोसळले होते. त्या वेळी "सकाळ'ने या अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगकडे लक्ष वेधले होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सुमारे आठ महिन्यांपूर्वी रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग हटविण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजगड पोलिसांनी अनधिकृत होर्डिंग हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना पत्र दिले होते. मात्र, अद्याप या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT