pune Sakal
पुणे

Pune News : तळेगाव ढमढेरेसह राज्यातील खेळाडूंचा इंडियाज ग्रेटेस्ट टॅलेंट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

इंडीयाज ग्रेटेस्ट टॅलेन्ट २०२२ या स्पर्धेत विविध कलाकार व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : राज्यासह तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील खेळाडूंचा पुणे येथे आयोजित केलेल्या इंडीयाज ग्रेटेस्ट टॅलेन्ट २०२२ या स्पर्धेत विविध कलाकार व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकामध्ये यशस्वी खेळाडू व कलाकारांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "मानव अधिकार फाउंडेशन भारत" आयोजित "इंडीयाज ग्रेटेस्ट टॅलेन्ट २०२२" स्पर्धेचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध कलागुणांनी परीपुर्ण असणारे ७०० हून अधिक खेळाडू व कलाकारांनी सहभाग नोंदवत आपल्या कला गुणांची प्रात्यक्षिके दाखवली. यामध्ये ३७ जणांनी आगळा वेगळा जागतिक विक्रम केला असुन त्यांच्या नांवाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ़ रेकॉर्डस् व वर्ल्ड ग्रेटेस्ट टॅलेन्ट वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

विश्वविक्रम करणारे महाराष्ट्र राज्यातील ३७ खेळाडू (यात तळेगाव ढमढेरे येथील खेळाडूंचा मोठा सहभाग आहे)

पुढील प्रमाणे:-हितेश वसंतराव डफ, श्रुती सोनू सिंग, तनिष्का पोपट ढेरंगे, तनवी बाळासाहेब थिटे, आयुष संतोष ढमढेरे, सार्थक संतोष इंगळे, भक्ती महेश भोईर, कृष्णा संतोष होन, गौरी मनोज धर्मे, अवधूत विकास पाटील, राधेय जितेंद्र जेधे, ज्योती मुलाराम खुडखुडिया, श्रेया योगेश भुजबळ, तेजल रविकांत चवरे, साक्षी संतोष भुजबळ, गीता जयकुमार ढमढेरे, आदित्य दिलीप चव्हाण, सुमित कृष्णा राठोड, प्रेम संतोष निघोट, समृद्धी संतोष भूमकर, ओम प्रमोद फुलसुंदर, संगिता मारोती ढोले, शौर्य शैलेश चव्हाण, हेमाली जगदीश जोशी, रोहन बाळासाहेब शेजवळ, करण ज्ञानेश्वर नाबगे, शाश्वती भानुदास शेंडगे, दुर्वांक शशांक म्हात्रे, शर्व निलेश राऊत, श्रेयश बालाजी भिसे, सिद्धी विलास थिटे, आदित्य गणेश पिंगळे, श्रावणी प्रमोद फुलसुंदर, शर्व आशिष फुलारी, वेदांत भाऊ जगताप, प्रमोद ज्ञानेश्वर फुलसुंदर.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आनंदराव ढमढेरे, कार्याध्यक्ष जालिंदर ढमढेरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मानव अधिकार फाऊंडेशन भारतचे महाराष्ट्र राज्य प्रदेशचे अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, महेश भुजबळ, चेतना ढमढेरे, संजीवनी राऊत, सविता हिंगणे, अमोल झणझणे, नवनाथ खरपुडे, दीपक वाडेकर, संतोष होन, मनोज धर्मे, ऍड. गणेश नरके, संतोष इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत इंगळेनगर (ता. शिरूर) येथील खेळाडू सार्थक संतोष इंगळे याने सलग एक हजार जोर मारण्याचा विक्रम केला त्यामुळे त्याची गणना इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. तसेच तळेगाव ढमढेरे येथील तेजल चौरे हिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ११.१० सेकंदात विक्रम केल्याने तिची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. शोएब बागवान यांच्या कबुतराने ७ दिवसात १००० किलोमिटर अंतर पार केले.

विश्व विक्रम कसा करावा हेच ग्रामीण भागातील मुलांना महिती नसते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारताचे नाव उंचवण्यास नक्कीच ही मुले सर्वांच्या पुढे असतील यासाठीच मानव अधिकार फाउंडेशन भारत याअंतर्गत रेकॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध कलाकारांचे परीक्षण त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे. भारतात प्रथमच या स्पर्धेतील कलाकारांनी विश्वविक्रम करून तळेगाव ढमढेरेसह महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.

प्रमोद फुलसुंदर ( मानव अधिकार फाऊंडेशन भारत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT