Pune
Pune  Sakal
पुणे

Pune : आंबेगावच्या कन्यांची खो खो मध्ये धडाकेबाज कामगिरी

नवनाथ भेके

निरगुडसर : उस्मानाबा(धाराशिव) येथे पार पडलेल्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाकडून खेळताना रांजणी ता. आंबेगाव येथील स्नेहल जाधव व काजल भोर या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक पटकावून देण्यात महत्वाची कामगिरी केली.

आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळातील स्नेहल जाधव व काजल भोर या दोघींचा राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघात निवड झाली होती.उस्मानाबाद (धाराशिव) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने अंतिम सामन्यात एअरपोर्ट अथोरिटी संघाचा पराभव करत अव्वल स्थान पटकावले.या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून एकमेव समावेश असलेल्या स्नेहल जाधव व काजल भोर यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरलेकाजल भोर हिची ही 16 वी राष्ट्रीय स्पर्धा असून स्नेहल जाधव हिची 9 वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा आहे.

तसेच दोघींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. काजल भोर हिने दक्षिण आशियाई खो खो स्पर्धेत भारतीय महिला संघातून खेळतांना सुवर्ण पदक पटकवले आहे. तर स्नेहल जाधव हिने जागतिक शालेय अथॅलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेतला होता अशी माहिती नरसिंह क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी दिली.

रांजणी सारख्या ग्रामीण भागातून खो खो सारख्या अस्सल भारतीय खेळातून केलेल्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल दोघींचे परिसरातून अभिनंदन होत आहे तसेच भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव प्रा डॉ चंद्रजीत जाधव,महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT