Student
Student Sakal
पुणे

Student : विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; पुण्यातील काही खासगी आयटी क्लासेसकडून फसवणूक

सम्राट कदम

आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खोटे अनुभवपत्र आणि पार्श्वभूमी देणाऱ्या काही खासगी क्लासेसनी शहरात धुमाकूळ घातला आहे.

पुणे - आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खोटे अनुभवपत्र आणि पार्श्वभूमी देणाऱ्या काही खासगी क्लासेसनी शहरात धुमाकूळ घातला आहे. राज्यभरातून विद्यार्थी नोकरीच्या आशेने पुण्यात येतात. त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक तर होते, त्याचबरोबर त्यांचे करिअर बरबाद होत आहे. कंपन्यांनी ‘बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन’ सुरू केल्यामुळे आता अशा क्लासेसचे पितळ उघडे पडत आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नक्की काय झाले?

शहरातील एका परिचित क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधीचा व्हिडिओ अपलोड केला असून, पैसे परत करण्याची मागणी ते करत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टिंग संबंधीचे प्रशिक्षण, तसेच नोकरी देण्याची हमी या क्लासने दिली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ४२ हजार रुपये शुल्क भरले होते. याच क्लासेसमध्ये शिकणारी निकिता सांगते, ‘‘क्लासवाले सुरुवातीला वेगळे बोलत होते. आता वेगळे बोलत आहेत. आम्ही पैसे भरूनही सॉफ्टवेअरमधील एसक्यूएल, अटॉमेशन किंवा मॅन्युअल टेस्टिंगचे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यात खोटे अनुभवपत्र दिल्यामुळे आमचे भविष्य अंधारमय झाले आहे. निदान क्लासवाल्यांनी पैसे तरी परत करावेत.’

आयटी कंपन्यांकडून अंतर्गत चौकशी सुरू

खोटे अनुभवपत्र आणि खोटे कौशल्य दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयटी कंपन्यांनी अंतर्गत चौकशी सुरू केली असून, दोषी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये. स्वतःच्या कौशल्यावर नोकरी मिळवावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

खोट्या क्लासेसचे हॉटस्पॉट

चिंचवड, विमाननगर, खराडी, मध्यवर्ती पुणे, मगरपट्टा, हडपसर

विद्यार्थ्यांनो, बळी पडू नका !

  • खोट्या क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ नका

  • कौशल्यावर भर द्या, विश्वासार्ह क्लासेस किंवा शिक्षण संस्थेत प्रवेश घ्या

  • खोटे अनुभवपत्र आणि बॅकग्राउंड जोडू नका

  • खोट्या आमिषांना बळी पडू नका

  • गुगलसह विविध डिजिटल माध्यमांवर मोफत आयटी कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याद्वारे अभ्यास करा

आत्ता काय घडतंय....

  • हजारो विद्यार्थ्यांनी आयटी कंपनीत नोकरीची हमी देणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला.

  • फ्रेशर्स विद्यार्थ्यांना कंपन्या घेत नसल्याने, क्लासेसवाल्यांनी खोटे अनुभवपत्राचे जुगाड करून दिले.

  • सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या, परंतु कौशल्ये नसल्यामुळे कंपनीच्या लक्षात आले.

  • मोठ्या आयटी कंपन्यांनी ‘बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन’ सुरू केले असून, खोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

  • क्लासेसच्या दबावामुळे विद्यार्थी खोटी माहिती देत असून, सत्य उघड झाल्यावर ‘ब्लॅक लिस्ट’ होण्याची भीती.

  • क्लासेसमध्ये योग्य प्रशिक्षण दिले जात नाही.

क्लासेसवाल्यांनी पैसे घेऊन ना शिक्षक दिले, ना प्रशिक्षण. मुलाखतीची तयारीही करून घेतली नाही. त्यांनी खोटे अनुभवपत्र जोडायला लावल्यामुळे ‘बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन’मध्ये मी नापास झाले. माझे भविष्यही बरबाद झाले.

- श्वेता, खासगी क्लासेसची विद्यार्थिनी

विद्यार्थ्यांनी खोट्या खासगी क्लासेसकडे वळू नये. तुमच्याकडून पैसे घेईपर्यंत हे लोक गोड बोलतात. कंपन्या सतर्क झाल्या असून, खोटा अनुभव देणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येतो. त्यापेक्षा कौशल्यावर भर द्या.

- रोहित दलाल, नोकरी मार्गदर्शक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT