Accident
Accident 
पुणे

Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना; आठवड्यानंतरही तपास कासवगतीने

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोंढवा व आंबेगाव येथील दुर्घटनेची संबंधित यंत्रणांनी चौकशी आणि पाहणी करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु, या घटनेची जबाबदारी निश्‍चित करून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आठ ते दहा दिवसांनंतरही महापालिका व पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली, त्यानंतर मात्र या प्रकरणाचा तपास अक्षरशः कासवगतीने सुरू आहे.   

कोंढवा येथे २९ जून रोजी पहाटे अल्कॉन स्टायलस या सोसायटीची सीमाभिंत शेजारील झोपड्यांवर कोसळून १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला, तर त्याच्या दोन दिवसांनंतर आंबेगावमध्ये त्याच पद्धतीने सीमाभिंत कोसळून सहा मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, कामगार ठेकेदार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, या घटनेस अन्य कोणकोणत्या यंत्रणा जबाबदार आहेत; त्यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली, याची सध्या चर्चा सुरू आहे. कोंढवा येथील घटनेचा अद्यापही गांभीर्याने शोध घेतला जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. तर, आंबेगावच्या घटनेमध्ये संबंधित बांधकामाची नोंद ग्रामपंचायत, त्यानंतर पीएमआरडीएकडे होती. त्यानंतर आंबेगाव महापालिकेत आल्यामुळे महापालिकेवरही या घटनेची जबाबदारी येते. या यंत्रणा कशा पद्धतीने या घटनेस कारणीभूत आहेत, याचा गांभीर्याने तपास होत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, २१ बांधकाम मजुरांच्या मृत्यूनंतर कोंढवा पोलिसांनी दोन, तर भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन, अशा एकूण चार आरोपींना अटक करण्याची तत्परता दाखविली. त्यातही कोंढवा पोलिसांनी संशयितांची घरे, कार्यालये व प्रकल्प कार्यालयांची झडती घेत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन कारवाई केली. मात्र, या दुर्घटनांना आठ ते दहा दिवस झाले. परंतु, अजूनही पोलिसांच्या कारवाईने वेग घेतलेला नाही. एकूणच, अन्य यंत्रणांप्रमाणे पोलिस प्रशासनाकडूनही ही प्रकरणे फारशा गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT