पुणे

#PunePollution पोल्युशन अंडर कंट्रोल कन्फ्यूजन

योगिराज प्रभुणे

पुणे - एकच गाडी शहरातील विविध रस्त्यांवर वेगवेगळे प्रदूषण करते, यावर तुमचा विश्‍वास बसेल? नाही ना, तरीही तुम्ही शहरात वेगवेगळ्या भागातील केंद्रांवर गाडीची ‘पीयूसी’ करा, म्हणजे वाहनांच्या प्रदूषणाची तपासणी करणारी यंत्रणाच किती दूषित आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

‘सकाळ’ने शहरातील विविध ठिकाणच्या नऊ पीयूसी केंद्रांवर एकाच दिवशी एका दुचाकीची ‘पीयूसी’ (पोल्यूशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र घेतले असता, त्यातून ही हास्यास्पद गोष्ट पुढे आली आहे. त्यामुळे तुमची गाडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रदूषण करते, की वेगवेगळ्या ठिकाणची ‘पीयूसी’ केंद्रच वेगवेगळ्या नोंदी देतात का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

प्रमाण 
कार्बन मोनोक्साइडच्या कमाल मर्यादा ३.५%
हायड्रो कार्बनची कमाल मर्यादा ४५०० PPM

निरीक्षण
वाहन प्रदूषण तपासणी मशिनचा पाइप तुटला असल्याचे सिंहगड रस्त्यावरील पेट्रोल पंपावर आढळून आले. 
‘पीयूसी’ तपासणी शुल्क ३० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत
वाहन तपासूनच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्यात आले.

निष्कर्ष
नऊ ठिकाणी केलेल्या ‘पीयूसी’च्या प्रत्येक नोंदी वेगळ्या
मालधक्का पेट्रोल पंपावर हार्डो कार्बनची नोंद ‘पीपीएम ओके’ अशी केली
हार्डो कार्बन प्रदूषणाच्या किमान आणि कमाल पातळीत एक हजार १३० ‘पीपीएम’चा फरक

‘पीयूसी’ केंद्रे ‘आरटीओ’च्या परवानगीने खासगी तत्वावर चालविण्यात येतात. दरवर्षी या परवान्याचे नूतनीकरण होते. नूतनीकरण करण्यापूर्वी प्रदूषण मोजणाऱ्या उपकरणाची तपासणी करण्यात येते. त्यानंतरही आता एकाच वाहनाची वेगवेगळी "पीयूसी' होत असल्यास याची चौकशी केली जाईल. तसेच, ‘पीयूसी’ करण्याबाबतचे प्रशिक्षणदेखील तेथील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. 
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

कोणती ‘पीयूसी’ प्रमाणित?
सिंहगड रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील केंद्रावर ‘पीयूसी’ केली. तेथे दुचाकीतून कार्बन मोनोक्‍साइड उत्सर्जित होण्याचे प्रमाण ०.३ टक्का होते. तीच गाडी सात किलोमीटर कृषी महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपावर पोचताच तिच्या प्रदूषणाची पातळी थेट १.५४ टक्‍क्‍यापर्यंत वाढली. गर्द झाडी असलेल्या या भागात गाडीच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याचे ‘पीयूसी’ मशिनने दाखविले. हार्डो कार्बनच्या प्रदूषण नोंदीचे निष्कर्षही फारसे वेगळे नाहीत. नाना पेठेत हार्डो कार्बनचे उत्सर्जनाचे प्रमाण १२० ‘पार्टिकल्स पर मिलियन’ (पीपीएम) नोंदले होते. त्याच गाडीचे कृषी महाविद्यालयाजवळीवर पंपावर एक हजार २४९ नोंदले गेले. त्यामुळे वाहन प्रदूषण नियंत्रणाचे नेमके कोणते प्रमाणपत्र योग्य, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT