IIT-Admissions.jpg
IIT-Admissions.jpg 
पुणे

#IITSutudent : आयआयटीत पुण्याची सेंच्युरी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशाच्या उंबरठ्यावर पुण्यातील जवळपास शंभर विद्यार्थी असून, आयआयटीमधील यंदाच्या प्रवेशाची 'सेंच्युरी' पूर्ण करण्याच्या तयारीत हे विद्यार्थी आहेत. एवढेच नव्हे, तर देशभरातील "टॉप पाच' किंवा "टॉप आठ' आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

पुण्यातील 350 ते 400 विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षेमधून प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यंदा आयआयटी प्रवेशासाठी पात्रतेचे प्रमाण वाढले आहे. देशातील 23 आयआयटीसह अन्य नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स परीक्षेतून जवळपास 38 हजारांपर्यंतची रॅंक देण्यात आली आहे. त्यातील पहिल्या दहा हजार रॅंकमध्ये पुण्यातील दोनशेहून अधिक विद्यार्थी असतील, असा अंदाज आहे. यातील बहुतांश विद्यार्थी टॉप आयआयटीमधील प्रवेशाच्या तयारीत आहेत. 


वेदांत डुंबरे (देश पातळीवरील रॅंक : 1,375) याला आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळाला आहे. तो म्हणतो, "इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेष रस असल्याने मी त्यामध्ये शिक्षण घेणार आहे. आयआयटी मुंबईमध्ये पहिल्या फेरीतच माझा नंबर लागला. प्रवेशाची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, येत्या 24 जुलैपासून शैक्षणिक अभ्यासक्रमास सुरवात होणार आहे.'' 


आयआयटी रुरकीमध्ये इंजिनिअरिंग फिजिक्‍ससाठी पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला यश पाठक म्हणतो, "मला कॉम्प्युटर सायन्समध्ये रस आहे. त्यामुळे अन्य टॉप आयआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करत आहे.'' यश याला जेईई ऍडव्हान्स परीक्षेत तीन हजार 40 ही रॅंक मिळाली आहे. चैत्रा साठे (रॅंक : 4,219) हिला आयआयटी मद्रासमध्ये मॅकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला आहे. लवकरच पुढील शिक्षणासाठी मद्रासला जाणार असल्याचे तिने सांगितले. 

जेईई मेन्स दिलेले विद्यार्थी : 11, 47,000 
जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : 2,45,000 
जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिलेले विद्यार्थी : 1, 61, 319 
जेईई ऍडव्हान्समधून पात्र ठरलेले विद्यार्थी : 38, 705 

विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी असलेले प्राधान्यक्रम : 
- आयआयटी : मुंबई, मद्रास, दिल्ली, खरगपूर, कानपूर (त्यानंतर रुरकी, गुवाहाटी, वाराणसी) 
- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), 
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (आयआयआयटी) 
- देशातील अन्य नामांकित संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT