सुधागडचे शक्तिपीठ असलेली सुधागड किल्ल्यावर विराजमान झालेली श्री भोराई देवी. (छायाचित्र, अमित गवळे) 
सुधागडचे शक्तिपीठ असलेली सुधागड किल्ल्यावर विराजमान झालेली श्री भोराई देवी. (छायाचित्र, अमित गवळे)  
पुणे

सुधागड किल्ल्यावर नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अमित गवळे

पाली (जिल्हा  रायगड) : सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्याचे शक्तिपीठ मानण्यात येते. सुधागडवासीयांसह इतर तालुक्यातील लोक वर्षातून एकदा अश्विन नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर गर्दी करतात. त्यांच्या उत्साहाला उधाण येते. 

सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराईदेवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगऋषींनी केलेली आहे. म्हणून या देवीला ‘भृगूअंबा, भोरांबा, भोराई’ अशीही नावे आहेत. देवीची मूर्ती 3 फुट उंचीची आहे. मूळ चंडीकेचे स्वरुप असणारी श्री भोराई चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, खङग-खेटक आणि दोन हातात आसूड आहे. श्री भोराईदेवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंतसचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदेवता/कुलस्वामीनी म्हणून मानले. मंदिरासमोर दगडाची उंच दीपमाळ आहे.

देवळात पोर्तूगीज धाटणीची मोठी घंटा आहे. मंदिराच्या परिसरात अनेक वृंदावने व समाध्या आहेत. ह्या सामाध्या तपस्या करणार्‍या साधकांच्या किंवा विरमरण आलेल्या तालेवाराच्या असाव्यात यावर सुबक नक्षिकाम केलेले आहे. 
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ उर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्तीसाठी देवीला नवस केला होता. त्यांना शंकरराव उर्फ रावसाहेब हा पुत्र झाला. तेव्हापासून 10 दिवसांच्या आश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. त्या काळात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तालुक्याचे मामलेदार यांच्यावर होती. मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी गाणे, सायंकाळी आरती, रात्री किर्तन असा कार्यक्रम असे. अष्टमीच्या दिवशी गडकर्‍यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे देत असत.

शतचंडी होमासाठी ब्राम्हण गडावर येत. सनई, चौघडा, संबळ, शिंगे, तुतार्‍या, ढोल वाजविले जात. शिलंगणाचे दिवशी पालखी निघत असे. आजही श्री भोराई देवस्थान मंडळाचे विश्वस्त गडावर नवरात्र उत्सव पूर्वापार पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. देवीच्या दर्शनासाठी किल्यावर येणारे भाविक आजुबाजूचा गर्द झाडीने नटलेला मनोहारी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोगररांगा, थंड हवा यांचाही आनंद लुटत असतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT