पुणे

PuneRains : अशी आहे पुण्यातील विविध भागातील परिस्थिती...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुण्यात अक्षरशः हाहाकार उडाला. शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या ओढ्यांना पूर आला. तर, कात्रज तलावही ओव्हर फ्लो झाला. आंबिल ओढ्याच्या दोन ठिकाणी भिंती ढासळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ओढ्याच्या पूराचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वेगाने शिरले. परिणामी, सहकारनगरमधील संजिवनी सोसायटी, गणेश सोसायटी, तर असाच, प्रकार कोल्हावाडी येथील लेन नंबर एकमधून जाणाऱ्या ओढ्याची भिंत कोसळली.

विविध भागातील सध्याची परिस्थिती

- जांभूळवाडी नवीन बोगद्यातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक दरीपूल परिसरात थांबविली.
- आंबिल ओढ्याला पूर.
- बालाजीनगर भागातील रजनी कॉर्नरच्या ओढापूलापासून काशिनाथ पाटील ओढापूलादरम्यान 50 हून अधिक घरांमध्ये पाणी
- कात्रज घाटातील तटावरून धबधब्यासारखे पाणी वाहू लागले.
- पीएमटीच्या मार्केटयार्ड डेपोची संरक्षक भिंत कोसळली.
- कात्रज येथील लेकटाऊन सोसायटी परिसर जलमय; दोन जण वाहून गेल्याची शक्‍यता?
- आंबेगाव खुर्दमधील शनिनगरच्या धोकादायक उतारावर पावसाच्या पाण्याचा हाहाकार.
- दांडेकर पूल झोपडपट्टीमधून आंबिल ओढ्यातून आलेले पाणी घरांमध्ये शिरले. पोलिस पाण्यात उतरून नागरिकांना बाहेर काढत होते.
- नांदेड येथील गोसावी वस्ती रस्त्यावर तीन-चार फूट पाणी. वाहतुकीसाठी रस्ता बंद.
- कात्रज येथील किमया सोसायटी परिसरातील वसाहतीत पाणी.
- वारजे परिसरात वनखात्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने मुख्य रस्ता जलमय.
- धनकवडी येथील सदगुरू पार्कच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी.
- कोल्हेवाडीतील मधुबन सोसायटी, आंबेनशोरा सोसायटी आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाणी. दोन्ही सोसायट्यांचा पहिला मजला पाण्याखाली. काही रहिवासी अडकून पडले.
- सहकारनगर परिसरातील तावरे कॉलनी, अरण्येश्‍वर, अण्णा भाऊ साठे नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT