raja dinkar kelkar museum Pune
raja dinkar kelkar museum Pune sakal
पुणे

केळकर संग्रहालयाचे पालटले रूप

सकाळ वृत्तसेवा

बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजे पुण्यातील जुन्या संग्रहालयांपैकी एक.

पुणे - बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजे पुण्यातील जुन्या संग्रहालयांपैकी एक. वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या या संग्रहालयाने आता कात टाकली आहे.

जर्मन सरकारच्या अर्थसहाय्यातून संग्रहालयात ‘ग्रीन, क्लीन अँड स्मार्ट म्युझियम’ साकारला असून या प्रकल्पामुळे संग्रहालयातील सुविधांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण झाले आहे. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे औचित्य साधून जर्मन वाणिज्यदूत सांस्कृतिक अधिकारी डेबोराह फॉन फ्रँकेनबर्ग या प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले.

जर्मन सरकारने दिलेल्या चाळीस लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून हा प्रकल्प साकारला गेला आहे. या प्रकल्पाद्वारे संग्रहालयाचे स्वरूप बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पर्यावरणपूरक यंत्रणा, स्वच्छतेची खबरदारी आणि तंत्रस्नेही सुविधा याद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पर्यटकांना जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही कालसुसंगत सुविधांची अपेक्षा असते. ती अपेक्षा आता पूर्ण होणार असून संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना इथे निश्चितच सुखद अनुभव मिळेल, याची खात्री वाटते.

- सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर संग्रहालय

प्रकल्पामुळे झालेले बदल

  • संग्रहालयात सौरऊर्जेचा वापर

  • पारंपरिक प्रकाशव्यवस्थेऐवजी सर्वत्र एलईडी दिवे

  • स्वच्छतेची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री

  • नवीन सात डिस्प्ले केसेस

  • डेटा व्यवस्थापनासाठी आवश्यक संगणकीय सामग्रीचे नियोजन

  • संग्रहालयाची परिपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ

  • आर्थिक व्यवहारांसाठी संकेतस्थळाशी जोडलेला पेमेंट गेटवे

  • संग्रहालयाची मराठी व इंग्रजी भाषेत माहिती देणारे मोबाईल ॲप्लिकेशन (लवकरच होणार उपलब्ध)

जर्मन सरकारचे अर्थसाहाय्य

  • ‘संस्कृती जतन योजने’अंतर्गत प्रकल्पाला अर्थसाहाय्य

  • जगभरातून निवड केलेल्या अवघ्या तेरा प्रकल्पांमध्ये समावेश

  • एक वर्षाचा अपेक्षित कालावधी असलेला प्रकल्प अवघ्या सात महिन्यांत पूर्ण

  • संग्रहालय व्यवस्थापनाचे विशेष कौतुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT