rajgad taluka will developed like Baramati says Sunetra Pawar lok sabha election
rajgad taluka will developed like Baramati says Sunetra Pawar lok sabha election Sakal
पुणे

Sunetra Pawar : बारामती सारखा राजगड तालुक्याचा विकास करणार - सुनेत्रा पवार

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे, राजगड : गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या ऐतिहासिक वेल्हे ( राजगड) तालुक्याचा बारामती सारखा विकास आगामी काळात केला जाईल असे आश्वासन बारामती हायटेक टेक्सटाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिले.

किल्ले राजगडच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथे आज गुरुवार (ता.२८)रोजी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या,'

अनेक दिवसांपासून वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड व्हावे ही मागणी होती.त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला असून अजूनही मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास होणे बाकी असून अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात बारामती प्रमाणे या तालुक्याचा विकास केला जाईल.

दरम्यान जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर म्हणाले,'

आमचा तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्यानंतर आम्ही हुरळून गेलो होतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात रोजगाराच्या अभावी येथील नागरिकांचे स्थलांतर शहराकडे होत असून तालुक्यातील मतदार संख्या घटत आहे .अजित पवार हे विकासाचे नेतृत्व करणारे नेते असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची कामे होतील.

कात्रज दुध संघाचे चेअरमन भगवान पासलकर म्हणाले,' ज्या पद्धतीने तालुक्याच्या नामांतरणाचा प्रश्न निकाली काढला त्याच पद्धतीने तालुक्यास रायगड जिल्ह्यास जोडणारा मढे घाटाचा प्रश्न अजित पवार यांनी हाती घेतला आहे तो तडीस नेतील असा विश्वास पासलकर यांनी व्यक्त केला.

भाजप तालुकाध्यक्ष आनंद देशमाने म्हणाले, विद्यमान खासदार, आमदार यांनी विकासाच्या नावाखाली तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे. विकासाचे दुसरे नाव अजित पवार आहे.

यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर,भाजपचे किरण दगडे पाटील, जिल्हा बॅंकेच्या संचालिका निर्मला जागडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत,महिला अध्यक्ष कीर्ती देशमुख ,

युवक अध्यक्ष संदीप खुटवड, लव्हीचे सरपंच शंकर रेणुसे, विकास नलावडे,प्रियांका बांदल,नीता खाटपे, संदीप शिंदे, आनंद शिंदे, सुभाष शिंदे,नीलेश खामकर, किरण खाटपे, शुभम बेलदरे, आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंजवणे गावचे सरपंच गुलाब रसाळ यांनी केले प्रास्ताविक प्रदीप गारटकर, यांनी केले तर आभार किरण खाटपे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT