पुणे

मुंबई अमराठी लोकांना आंदण दिलेय? 

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुंबईमध्ये मराठी माणसांच्या शिक्षण संस्था उभ्या राहात नाहीत. त्यामुळे मुंबई शहर अमराठी लोकांना आंदण देऊन टाकलंय की काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्रीय मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कै. रमेश दामले स्मृती प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ हा पुरस्कार ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी पोलिस आयुक्त श्रीकांत बापट, मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले या वेळी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, ‘‘शिक्षण संस्था चालविण्याचा अनुभव असलेल्यांनी मुंबईमध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे. गुजराथी, मारवाडी आणि सिंधी यांच्या संस्था तेथे उभ्या राहात आहेत आणि आपल्या लोकांच्या संस्था उभ्या राहात नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.’’ 

पोलिस खात्याबद्दल ते म्हणाले, ‘‘पोलिस खात्याबद्दल आज नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून आदर आहे. महाराष्ट्रात परराज्यांतून ४८ रेल्वे येतात. त्या येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. ही येणारी कोण आहेत, याची माहिती नाही. पण, त्यानंतरही राज्यात शांतता राहते. त्यामुळे गणवेशातील ही माणसे महत्त्वाची आहेत.’’

गोखले म्हणाले, ‘‘करियरची सुरवात महाराष्ट्रीय मंडळामध्ये झाली. व्यायाम, क्रीडा, शिक्षण यात योगदान देणाऱ्या या संस्थेने आता कलेतही पाऊल टाकले आहे.’’ या वेळी फणसळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दामले यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT