Ranjana Tilekar did emotional appeal to common people for yogesh tilekar
Ranjana Tilekar did emotional appeal to common people for yogesh tilekar 
पुणे

Vidhan Sabha 2019 : योगेशला सर्वसामान्यांनीच न्याय द्यावा; रंजना टिळेकरांचे भावनिक आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य माणसांनीच न्याय द्यावा,'' असे भावनिक आवाहन नगरसेविका रंजना टिळेकर यांनी केले.

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर व पत्नी संध्या टिळेकर यांनी कात्रज संतोष नगर परिसरात पदयात्रा काढून कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्याकडून कात्रज, संतोषनगर, कोंढवा परिसरामध्ये गेली आठ-दहा दिवसापासून घरटी प्रचार करण्यात येत आहे. फटाके वाजवीत, रांगोळी रेखाटून व फुलांच्या वर्षावात त्यांचे परिसरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला या पदयात्रेत सहभागी होत आहेत.

संध्या टिळेकर म्हणाल्या,"महिलांसाठीच्या विविध योजन केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी राबविल्या आहेत. या माध्यमातून त्यांना मानसन्मान मिळवून दिला आहे. कात्रज-कोंढवा परिसराचा सर्वसमावेशक विकास साधण्यात आमदारांना यश आले आहे. त्यामुळे माझ्या माता-भगिनींसह सर्व मतदार उमेदवार टिळेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून मताधिक्य मिळवून देतील, असा मला आत्मविश्वास आहे.'

नगरसेविका मनिषा कदम, राणी भोसले, वृषाली कामठे, माजी नगरसेवक कल्पना थोरवे, संध्या टिळेकर, भाऊसाहेब दुगड, नाना फाटे, राजेश कदम, संदीप बेलदरे, महेश जाधव, योगेश शेलार, राजाभाऊ कदम, सागर कदम, तुषार कदम, हरिभाऊ कामठे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT