crime
crime 
पुणे

पिंपरीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एकीचा मृत्यू 

संदीप घिसे

पिंपरी, (पुणे) : चॉकलेटचे आमिष दाखवून एका बालिकेवर दोन जणांनी तर दुसऱ्या बालिकेवार एकाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना  हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी घडली. पोलिसांनी एकाला तरुणाला ताब्यात घेतले आहे. यापैकी एकीचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गणेश निकम (रा. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना स्टाफ कॉलनी, कासारसाई. मूळगाव जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्षाच्या दोन्ही मैत्रिणी रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि त्याचा मित्र दोघे उभे होते. या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचेआमिष दाखवले. चॉकलेट देतो असे सांगून मंदिरा मागील झाडीत नेले. या झाडीत जबरदस्तीने आणि धमकावून दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. तर यातील एका पीडित मुलीवर दोघांनी आळी-पाळीने लैंगिक अत्याचार केले. यानंतर या दोन्ही मुलींना धमकवण्यात आले. या प्रकाराबाबत कोणाला सांगायचे नाही, सांगितले तर पाहतो अशी धमकी दिली. यामुळे पीडित मुली अत्याचार होऊनही शांत होत्या. 

मंगळवारी यापैकी एका मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीची प्रकृती आणखी खालावल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गणेश निकम याला अटक करून त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT