Mancher
Mancher Sakal
पुणे

मंचरला शिवतांडव स्तोत्र पठण प्रसंगी

डी के वळसे पाटील

मंचर : येथील तपनेश्वर मंदिरासमोर अमरनाथ सेवा संघाने आयोजित केलेल्या शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला महिलांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. रात्री होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर “रात्री दहाच्या आत घरात” या उपक्रमाची घरोघर अमलबजावणीबाबत जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी प्रतिज्ञाद्वारे उपस्थित ५०० महिलांनी जाहीर केला.

बीड, अंबरनाथ, पुणे मुंबई, लोणावळा, बारामती या दूरवरच्या भागातील महिला बसद्वारे मंचर बाजार समिती येथे आल्या. सवाद्य मिरवणूकीने ओम नमः शिवाय असा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तपनेश्वर मंदिरासमोर भाविक महिलांचे आगमन झाले. अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सुर्यकांत धायबर, अध्यक्ष दिलीप महाजन, सचिव गणपत क्षीरसागर यांनी महिलांचे स्वागत केले. मनिषा रावळ, सुषमा शिंदे, अश्विनी शेटे, वंदना बाणखेले, स्वाती रामरीकर, रुपाली थिगळे, सुरेखा लांडगे, तनुजा पिंगळे यांनी शिव तांडव स्तोत्र पठणचा शुभारंभ केला.

एका सुरात तीन शिव तांडव स्तोत्र सादर करण्यात आली. यावेळी जय भोलेनाथ घोषणा देण्यात आल्या. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व महिला भीमाशंकरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या.

“सद्यस्थितीत कामाच्या व्यापामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रात्री १२ ते पहाटे पाच या वेळात भीषण अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा, महिलांचा व मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरनाथ सेवा संघ व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था (मंचर) यांच्यावतीने 'रात्री दहाच्या आत घरात' हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकामी महिला भाविकांनी पुढाकार घेऊन घर व गावात जनजागृती करावी.” - सुर्यकांत धायबर ( संस्थापक अमरनाथ सेवा संघ मंचर, ता.आंबेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT