पुणे

पुण्यात "रेकॉर्ड ब्रेक' पाऊस 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील "रेकॉर्ड' मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. जुलैच्या सुरवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाचा हा जोर कायम होता. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. कमाल तापमान सरासरीपेक्षाही जास्त वाढले. उन्हाचा चटका वाढला. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. सलग चार दिवस पावसाच्या सरी पडत आहेत. महिन्याच्या सुरवातीला पडलेला पाऊस आणि पुन्हा सक्रिय झालेला मॉन्सून यामुळे जुलैमधील गेल्या दहा वर्षांमधील पावसाचा उच्चांक यंदा मोडला. 

पुण्यात 2009 ते 2018 या दहा वर्षांमध्ये 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत 359.2 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा गेल्या दहा वर्षांमधील उच्चांकी पाऊस आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. 

पुण्यात या वर्षी 1 जून ते 30 जुलैदरम्यान 561.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी 315.2 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा 246.6 मिलिमीटर जास्त पाऊस पडला असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात सरीवर सरी 
शहरात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. दुपारी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 8.7 मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, लोहगाव येथे 9.4 मिलिमीटरची नोंद झाली होती. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 34.6 मिलिमीटर पाऊस पडला. तर, पाषाण येथे याच वेळेत 48.2 मिलिमीटर पाऊस नोंदण्यात आला. 

पावसाचा अंदाज 
31 जुलै ः शहर आणि परिसरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता 51 ते 75 टक्के आहे. 
1 आणि 2 ऑगस्ट ः पावसाच्या हलक्‍या सरी पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT