Transaction
Transaction 
पुणे

देशभरात दिवाळीत १० वर्षांतील विक्रमी उलाढाल; ऑल इंडिया ट्रेडर्सची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - यंदाच्या दिवाळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने देशभरात मालाची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडीत काढत १ लाख २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. एकट्या दिल्लीत सुमारे २५ हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीत मंदी आली होती, त्यामुळे बाजारपेठेत उठाव नव्हता. पण यंदाच्या आकडेवारीने दिवाळीच्या दिवशी गेल्या १० वर्षांतील विक्रीचा विक्रम मोडला असून, मातीचे दिवे, कागदी दिवे, मेणबत्त्या इत्यादी पारंपरिक दिवाळीच्या वस्तूंना जास्त मागणी असल्यामुळे भारतीय कारागिरांचा चांगला व्यापार झाला. याशिवाय गृह सजावटीच्या वस्तू, मिठाई, ड्रायफ्रूट्स, कपडे, शूज, घड्याळे, खेळणी अशा इतर उत्पादनांची मागणीही मोठ्या प्रमाणात होती. व्यापारी आता १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. तसेच यंदा दिवाळीत नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदीवर भर दिल्याने चीनचे सुमारे ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असा दावा भारतीया व खंडेलवाल यांनी केला.

पुण्यात गेले दीड वर्ष कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प होती; परंतु या वर्षी ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेतील खरेदीला प्राधान्य दिले, त्यामुळे सर्व व्यापारी वर्गाला ही दिवाळी नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यंदा घरगुती व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT