crime-logo.jpg 
पुणे

विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत रायफल व तलवारींचा नाच

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निगडीत रविवारी (ता. 2) रात्री काढलेल्या शोभा यात्रेत एअर रायफल व तलवारी मिरविण्यात आल्या. याप्रकरणी परिषदेचे पदाधिकारी व 250 कार्यकर्त्यांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे व जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत निगडीतील अंकुश चौक ते यमुनानगर येथील ठाकरे मैदानादरम्यान परिषदेच्या वतीने विनापरवाना शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेतील चार मुलींच्या हातातील एअर राईफलचे ट्रीगर दाबताच आवाज येत होता. तसेच पाच मुली हातात तलवार घेऊन मिरवत असताना घोषणा देत होत्या.
 

पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शस्त्र बाळगण्यास बंद आहे. मात्र, परिषदेच्या कार्यक्रमात या आदेशाचा भंग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१.६२ लाख शिक्षकांची चिंता वाढली! सर्वोच्च न्यायालयाच्या ‘टीईटी’च्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारला पुनर्विचार याचिकेचा अधिकार नाही; विधी व न्याय विभागाचा अभिप्राय

Deputy CM Ajit Pawar: जनतेच्‍या कामासाठीच भाजपसोबत: उपमुख्‍यमंत्री अजित पवार; रहिमतपूरला सुनील मानेंची राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये ‘घरवापसी’

Panchang 10 November 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यपालांचा अध्यादेश! महापालिका, नगरपालिका हद्दीतील व शेतीच्या गुंठेवारीस परवानगी; १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळातील गुंठेवारी फुकटात होणार नियमित

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक ब्रोकोली पराठा, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT