chakan robbery
chakan robbery 
पुणे

चक्क हवा शुद्धीकरण यंत्रांची चोरी 

हरिदास कड

चाकण : चोरट्याने मंगळसूत्र लांबवले, पाकीट चोरले, अशा बातम्या नेहमीच आपण वाचतो. पण, चाकणमध्ये चोरट्यांनी कमालच केली. त्यांनी चक्क हवा शुद्धीकरणाची दोन यंत्रेच लांबविली. या अनोख्या चोरीची परिसरात चर्चा रंगली आहे. या यंत्रांची चोरी करून चोरट्यांना नक्की काय करायचे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

चोरीचा हा भन्नाट प्रकार घडला आहे, खेड तालुक्यातील चाकण येथे. येथे पुणे- नाशिक महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौकात लायन्स क्‍लबच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी बसविलेली हवा शुद्धीकरणाची दोन यंत्रे (प्रदूषण नियंत्रण यंत्र) शनिवारी (ता. 13) रात्री चोरट्यांनी लांबविली. सुमारे सत्तर हजार रुपये किमतीची ही यंत्रे होती, अशी तक्रार लायन्स क्‍लबचे अध्यक्ष मधुकर सातव यांनी आज पोलिसांत दिली आहे. 

पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे हवा शुद्धीकरणासाठी लायन्स क्‍लबच्या वतीने चाकणला आंबेठाण चौक, तळेगाव चौक व माणिक चौक या ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र, शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी आंबेठाण चौक व तळेगाव चौक या ठिकाणची दोन यंत्रे लांबविली. ही यंत्रे तीन फूट उंचीची व दोन फूट रुंदीची आहेत. यंत्रे चोरीला गेल्याचा प्रकार लायन्स क्‍लबचे बाळासाहेब नवले यांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती अध्यक्ष सातव यांना दिली. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT