robbery.jpg
robbery.jpg 
पुणे

औंध, बाणेरनंतर आता पाषाणमधील दुकानांकडे चोरट्यांनी...

सकाळवृत्तसेवा

औंध (पुणे) : लाॅकडाऊनच्या काळात चोरट्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर दुकाने फोडून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. 
औंध, बाणेर नंतर आता पाषाण व बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सोहनलाल अगरवाल (रा. बाणेर) यांचे किराणा मालाचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री हे दुकान फोडले. केवळ एकच नाही तर अशी अजून तीन दुकाने चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

अगरवाल यांच्या तक्रारीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. यामध्ये अगरवाल यांच्या अगरवाल सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून दुकानात असलेली पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली. तसेच दिनेश सबाराम चौधरी यांचे उत्तम सुपर स्टोअर, प्रकाश ओमपुरी गोस्वामी यांचे हरी ओम सुपर मार्केट तर पाषाण येथील बालाजी सुपर मार्केट या दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. लाॅकडाऊनच्या काळात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औंध, बाणेर, पाषाण परिसरातील दुकानात चोरट्यांकडून चोरीच्या घटना वाढल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

परिहार चौकातील दुकानांसह बाणेरमधील दुकानात चोरी करुन चोरटे पसार झाले होते. बाणेर, औंध व पाषाण परिसरातील एकूण सतरा दुकाने या कालावधीत चोरट्यांनी फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सततच्या दुकाने फोडून होणाऱ्या चो-यांनी औंध, बाणेर, पाषाण परिसरातील लहान मोठे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. तर यासारख्या सतत होणाऱ्या चो-या रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे चोरट्यांनी उभे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT