rohit and parth pawar
rohit and parth pawar 
पुणे

Loksabha 20129 : रोहित-पार्थ एकत्रच आहेत! हा घ्या पुरावा..!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये होळीच्या निमित्ताने पार्थ-रोहित या पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्या बद्दलच्या वायफळ चर्चाचं दहन केलं. संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहितने होळीचे काल (ता. 20) पूजन केले.

माढा लोकसभेतून आजोबा आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थसाठी माघार घेत, पार्थचा मावळ लोकसभेचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा आजोबांनी पुनर्विचार करावा अशी जाहीर विनंती रोहितने केली होती. या विनंतीने पार्थ-रोहित मध्ये वादाचा रंग असल्याची चर्चा राज्यभर रंगली. सोशल मीडियावर तर या पवार बंधूंवर फवारे उडवले गेले. पण या फवाऱ्यांना बेरंग करत दोघांनी सर्वांची बोलती बंद केली.

होळीच्या निमित्ताने पार्थ-रोहितने वादाच्या चर्चांचे दहन केले. आजोबा आणि बाबानंतर आता पार्थसाठी भाऊ ही मैदानात उतरलाय. सध्या सोशल मीडियावर विविध अंगांनी प्रचाराचा रंग उधळणारा पार्थ जाहीर सभेत फिका पडू लागलाय. पण आता रोहितच्या फवाऱ्यांनी जाहीर सभेतील ती कमतरता भरून निघेल हे नक्की.

काल (ता. 20) पार्थ पवार यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त रोहित पवार यांनी काल एक पोस्ट शेअर केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT