rto-pune
rto-pune 
पुणे

आरटीओने रिक्षाचालकांना विमा परतावा मिळवून द्यावा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कायद्यानुसार बंद असलेल्या वाहनांसाठी विमा हप्त्याचा परतावा मिळू शकतो. त्यासाठी वाहन बंद असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने द्यावे. त्यामुळे चार महिन्यांचा विमा हप्त्याचा सुमारे 3ते 4 हजार रुपये परतावा रिक्षाचालकांना मिळू शकेल, अशी मागणी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नीतिन पवार यांच्या नेतृत्वाखालील चंदनकुमार आनंद बेलमकर, बापू कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याकडे केली. 

यावेळी पवार म्हणाले, ""अलीकडेच शासनाने रिक्षा परवाने खुले केले. त्यामुळे रिक्षा सेवेतून मिळणारे उत्पन्न घटले होते. त्यात कोरोना व टाळेबंदीमुळे 4 महिन्यांहून जास्त काळ रिक्षा बंद होत्या. 1 ऑगस्ट पासून त्या सुरू झाल्या तरी प्रचंड मंदी व कोरोना लागण होण्याची भीती यामुळे रिक्षांना पुरेसा व्यवसाय नाही.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे रिक्षा थांब्यांवर प्रवासी येणे ही पूर्वीची पद्धत बाद होईल. त्यासाठी रिक्षा पंचायतीच्या ऍप बेस रिक्षा सेवेच्या प्रस्तावाला त्वरित परवानगी द्यावी. रिक्षांना छोट्या वस्तू, पार्सलच्या, आकार व वजन याच्या मर्यादेत वाहतुकीस परवानगी द्यावी. यामुळे रिक्षाचालकांना जोड व्यवसाय मिळेल. रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी रोलर ब्रेक टेस्टर काम दीड वर्षापासून अपूर्ण आहे, ते तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी रिक्षा पंचायतीने केली. दरम्यान, शिंदे यांनी बहुतेक मागण्यांना अनुकूलता दर्शवून आवश्‍यक तेथे परिवहन आयुक्तालयाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवू असेही स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT