Rules needed to start a junior college are not followed 
पुणे

नियम धाब्यावर बसवून महाविद्यालयीन वर्ग सुरुच?

संतोष शाळिग्राम

पुणे : कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्‍यक नियमांची पूर्तता न करताच वर्ग चालविणाऱ्या महाविद्यालयांची अधिकाऱ्यांमार्फत गोपनीय तपासणी करण्यात आली. मात्र, त्याचा अहवाल अद्याप गुलदस्तात असून, शैक्षणिक सुविधांचा अभाव ठेवून नियमभंग करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर अद्याप शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुरेशी जागा नसणे, बायोमेट्रिक हजेरी नसणे यांसारख्या अनेक त्रुटी ठेवून वर्ग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचा आदेश दिला होता. उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात अनेक गैरप्रकार आढळले आहेत; परंतु अद्याप या शाळांना ना शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई ना आयुक्तांनी त्याची दखल घेतली आहे.

एखाद्या सदनिकेमध्ये तीन हजार चौरस फूट जागेत कनिष्ठ महाविद्यालय चालविणे, विद्यार्थ्यांना बसायला जागा पुरेशी नसणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा नसणे, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा नसणे, वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती नसणे यांसारख्या अनेक गंभीर बाबी या पाहणी आढळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले; पण त्याची दखल शिक्षणाधिकारी स्तरावरून घेतली जात नाही.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या या बाबी आहेत; पण या समस्यांबाबत कुणाची तक्रारी आली, तर कारवाई बघू, अशी भूमिका घेऊन शिक्षणाधिकारी हातावर हात ठेवून आहेत. शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच या प्रकारांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याविषयी देखील संशयाची भावना शिक्षण खात्यात आहे.

पुन्हा तपासणी करणार : सोळंकी
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता ते म्हणाले, "कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी झाली असली, तरी त्याची पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे. त्यासाठी बाहेरगावातील अधिकाऱ्यांमार्फत ही तपासणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातून तेथील नेमकी स्थिती समोर येईल. यासंबंधी प्रधान सचिवांबरोबर चर्चा झाली आहे. प्रत्यक्ष कार्यवाही लवकर होईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT