rupi bank sakal
पुणे

रुपी बॅंकेच्या ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया

अर्ज स्वीकारण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना एकूण ठेवींपैकी पाच लाखांपर्यंतची रक्कम परत करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. त्यासाठी ठेवीदारांनी संबंधित शाखेमध्ये अर्जासोबत केवायसी कागदपत्रांची पूर्तता येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत करावी, असे आवाहन रुपी बॅंकचे प्रशासक सुधीर पंडित यांनी केले आहे.

गेली आठ वर्षे बँक बंद असल्यामुळे ठेवीदारांच्या केवायसी कागदपत्रांची पूर्तता होवू शकली नाही. कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ठेवीदारांना प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी शाखांमध्ये सूचना फलकावर तसेच संकेतस्क्षहावर माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिक ठेवीदार जास्त असून, त्यांना मदत व्हावी म्हणून कर्मचारी प्रयत्नशील आहेत. अर्जांची छाननी बँकेकडून होणार असून, ठेव विमा महामंडळाकडून तपासणी झाल्यानंतर, ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची रक्कम त्यांच्या इतर बँकेत जमा करण्यात येणार आहे, असे पंडित यांनी सांगितले.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे दोन प्रतींमध्ये जोडून द्यावीत. शाखेमध्ये जाताना ठेवीदारांनी कागदपत्रे, दोन फोटो आणि शाखा पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.


  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड (स्व-साक्षांकित व त्यावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक).

  • मुदतठेव पावती असल्यास त्याची पाठपोट झेरॉक्स.

  • सेव्हिंग्ज, रिकरिंग खाते असल्यास पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.

  • क्लेमची रक्कम जमा होण्यासाठी, रुपी बँकेशिवाय इतर बँकेतील खात्याचा रद्द केलेला पण सही न केलेला धनादेश आणि त्याची झेरॉक्स प्रत. असा धनादेश नसल्यास पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (आयएफएससी कोड, नाव आणि खाते क्रमांक).

  • ठेवीदारांनी अर्जामध्ये खाडाखोड करू नये. अर्जावर फोटो चिकटवू नयेत. खाते क्रमांक आणि खात्याची शिल्लक याची माहिती शाखेमध्ये विचारूनच लिहावी. बाहेरगावी किंवा मृत खातेदारांबाबत सादर करावयाची कागदपत्रांबाबत शाखेकडे चौकशी करावी.

बॅंकेची शाखा, पत्ता आणि कंसात दूरध्वनी क्रमांक

  • सोमवार, रास्ता पेठ आणि भवानीपेठ शाखा : ९७९ भवानी पेठ, लक्ष्मी बाजार, पुणे (०२०-२६३५३०४४, २६३४३३५२).

  • लक्ष्मीरोड आणि बुधवारपेठ शाखा : ८३, बुधवारपेठ, गणपती चौक, शास्त्री चेंबर्स, पुणे (०२०-२९९९१११२, २४४५०३९५).

  • कोंढवा आणि कॅम्प शाखा : ३२५, एम.जी.रोड, ताबूत मार्ग, रुपी हाऊस, अरोरा टॉवरजवळ, कॅम्प, पुणे (०२०-२६०५४३०३, २६०५४३०१).

  • कोथरूड आणि कर्वेनगर शाखा : योगदा अपार्टमेंट, कोथरूड, कर्वेनगर रोड, पुणे (०२०-२५४७०९८३, २५४७३०९७).

  • नौपाडा आणि कोपरी शाखा : राजेश हौसिंग सोसायटी, संत गजानन महाराज मठाजवळ, नौपाडा, ठाणे (मोबाईल- ८९२८३८१६५७).

  • पांचपाखडी आणि सुभाष रोड शाखा : सिद्धिविनायक अपार्टमेंट, स्टेशन रोड,ठाणे (०२२- २५३३१६७०, २५३६१०१०).

  • बांद्रा आणि विलेपार्ले शाखा : रोकडिया लॅंडमार्क हौसिंग सोसायटी, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई (०२२- २६१३६५८२).

  • रुपी को-ऑप. बँक, मुख्य कार्यालय : प्लॉट नं. बीसी-१, गेट नं. ५, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७ दूरध्वनी क्रमांक ०२०-२४२७० १४८/२४२७०३४८/२४२७०५४८

  • इ- मेल - boardarupeebank.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT