arrest.jpg
arrest.jpg 
पुणे

16 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास 'एसीबी'कडून अटक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जमीनीसंदर्भातील 'आठ अ' उताऱ्याची नोंदणी करण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई खेड तालुक्‍यातील खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी करण्यात आली. 

बाळु बबन मलगे असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 60 वर्षीय नागरीकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खेड तालुक्‍यातील खराबवाडी येथे राहतात. त्यांच्या जमीनी संदर्भाती 'आठ अ' उताऱ्याची नोंदणी त्यांना करायची होती. त्यानुसार, त्यांनी खराबवाडी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला होता. दरम्यान, खराबवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी असलेल्या बाळु मलगे यांनी 'आठ अ' उताऱ्याची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांच्यामध्ये 16 हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदार यांनी याप्रकरणी 'एसीबी'कडे तक्रार दिली. त्यानुसार, पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे व पोलिस उपअधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या पथकाने खराबवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये शनिवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी मलगे याने तक्रारदाराकडून 16 हजार रुपये स्विकारले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. मलगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

SCROLL FOR NEXT