Safe-Pune
Safe-Pune 
पुणे

#SafePune ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर पडले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री साडेअकरा वाजता कोथरूड येथे घडली. याप्रकरणी ट्रकचालकासह विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरेखा प्रदीप वाणी (वय ५५, रा. सिद्धिविनायक सोसायटी, गुरुगणेशनगर, कोथरूड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय वाणी (वय ६४) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप वाणी हे सेवानिवृत्त आहेत. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून पत्नी सुरेखा यांच्यासमवेत कोथरूड येथील घरी जात होते. ते चांदणी चौकातून पौड रस्त्याने कोथरूड डेपोच्या दिशेने तीव्र उतारावरून येत होते. त्याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्यामुळे प्रदीप वाणी हे घाबरल्याने त्यांची दुचाकी काही प्रमाणात हलली.

त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकचा त्यांच्या दुचाकीला धक्का बसला. त्यामुळे वाणी यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी खाली पडल्या. त्यानंतर ट्रक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT