Sakal Conclave opportunities sakal vidhya law Architect Enrollment begins Colleges can also participate
Sakal Conclave opportunities sakal vidhya law Architect Enrollment begins Colleges can also participate  sakal
पुणे

Sakal Architect Symposium : आर्किटेक्टमधील करिअर संधीवर आज मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्किटेक्ट अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन व्हावे आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘सकाळ आर्किटेक्ट सिंपोजीयम’ आयोजित करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा केंद्र येथे या सिंपोजीयमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष अभय पुरोहित उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे.

तसेच एमकेएसएसएसचे डॉ. बीएन कॉलेज ऑफ आर्किटेक्टच्या प्राचार्य धनश्री सरदेशपांडे, पुणे आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवि गद्रे, इग्रिन आर्किटेक्टचे अध्यक्ष किरण काळे यावेळी उपस्थित असतील.

विशेष म्हणजे आर्किटेक्ट मधील बदलता ट्रेंड आणि करिअर संदर्भात प्राचार्य प्रसन्न देसाई, प्राचार्य अनुराग कश्यप आणि प्राचार्य उज्ज्वला पळसुले यांचा परिसंवादही पार पडणार आहे. वाढत्या शहरीकरणात शाश्वत विकासासाठी आर्किटेक्टची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असून, वैयक्तीक व्यावसायाच्या पलीकडे हे क्षेत्र मोठा विस्तार घेत आहे.

या क्षेत्रातील नजीकच्या काळातील नोकरी आणि व्यावसायाच्या संधीबद्दल येथे मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांतील प्रवेश परीक्षा आणि आर्किटेक्ट व्यावसायातील आव्हांनाचीही माहिती तुम्हाला मिळेल.

स्पर्धा परीक्षेवर धर्माधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोमध्ये एमपीएससी-युपीएससी संदर्भात माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहे. सकाळी ११ वाजता त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडेल.

यावेळी एमपीएससी आणि युपीएससीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव कथनही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप बदलत असून, अचूक नियोजनाबरोबरच योग्य निर्णयप्रक्रियाही महत्त्वपूर्ण ठरत आहे. दुपारी दोन वाजता दिनेश भुतडा या वर्षीच्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया आणि करिअर संधींचेही मार्गदर्शन करणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्की याचा उपयोग होणार आहे.

आजची शेवटची संधी...

शहरातील तब्बल ४० शैक्षणिक संस्था, १०० हून अधिक अभ्यासक्रम आणि करिअर मार्गदर्शनाच्या या भव्य मेळाव्याला भेट देण्याची रविवारी (ता.११) शेवटची संधी आहे. सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा केंद्र येथे सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो खुला राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक परिसंवादाला स्वतंत्रपणे लकी ड्रॉ द्वारे दोन विद्यार्थांना वाईल्डक्राफ्टची बॅग भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी एक्स्पोला भेट द्यायचे विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT