Sakal-India-Foundation
Sakal-India-Foundation 
पुणे

शिष्यवृत्तीसाठी आजपासून अर्ज स्वीकारणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या वतीने उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या  शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यामधील आपल्या साठ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करून ‘हीरकमहोत्सवी’ वर्षात प्रवेश केला आहे. यानिमित्त २०१९-२० या वर्षी प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.

फाउंडेशनतर्फे २०१८-१९ या वर्षापासून देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती म्हणून ७० हजार रुपयांची एक याप्रमाणे जवळजवळ ५५ जणांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याचप्रमाणे देशात पीएच. डी. करण्यासाठी किंवा परदेशातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. 

आता हीरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशातील पदवीधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठाकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०१९-२०) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना देशातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेत पीएच. डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१७ किंवा त्यापूर्वीचे विद्यापीठाचे, राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जाणार आहेत. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची परतफेड दोन वर्षांत किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे.

दानशूर व्यक्तींना आवाहन
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. फाउंडेशनचे २०१९-२० हे वर्ष ‘हीरकमहोत्सवी’ वर्ष आहे. यानिमित्ताने हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. पुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. या आर्थिक मदतीवर प्राप्तिकर सेक्‍शन ८० खाली सवलत मिळू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क -  (०२०) २४४०५८९७/२४४०५८९५/२४४०५८९४ (वेळ सकाळी १० ते दुपारी १)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT