Sakal Media Youtube Channel
Sakal Media Youtube Channel Sakal
पुणे

‘कलाबहर-सीझन २’ आजपासून पाहायला मिळणार

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ’ मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर शुक्रवारपासून (ता. १५) ‘कलाबहर-सीझन २’ नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

पुणे - ‘सकाळ’ मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर (Sakal Media Youtube Channel) शुक्रवारपासून (ता. १५) ‘कलाबहर-सीझन २’ (Kalabahar Season-2) नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

सर्वसामान्य माणसाला नेहमीच प्रश्न पडतो, की एखाद्या पेंटिंगला एवढी करोडो रुपयांची किंमत का मिळते? किंवा एखादे गाजलेले चित्र एवढे कशामुळे प्रसिद्ध पावते? चित्रं नेमकी बघायची तरी कशी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं रसिकांना या मालिकेतून मिळतील. तसेच एक नवी दृष्टी प्राप्त व्हावी यासाठी कलाबहारच्या पहिल्या पर्वाची निर्मिती निर्माते-दिग्दर्शक द्वयी वैभव-राजेंद्र यांनी केली होती. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. रसिकांचे कुतूहल जागृत झाले. म्हणून कलाबहरच्या दुसऱ्या पर्वाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

यामध्ये ‘रंगूनी चित्रात सारे’, ‘मनी वसे ते चित्रात दिसे’, ‘रंग माझा वेगळा’, ‘रेषेतून व्हा व्यक्त’, ‘चित्रास अर्थ देणारा पोत’, ‘रेषेतून आकृतिबंधाकडे’, ‘कलाकृतीची महानता नेमकी कशात?’, ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे’, ‘चित्रकृती अनुभवण्याचे आनंदक्षण’ आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

थीम टीम स्टुडिओची निर्मिती असलेल्या या मालिकेमध्ये या सर्व विषयांवर चित्रकार गायत्री तांबे-देशपांडे या आपल्याशी बोलणार आहेत. ही संकल्पना राजेंद्र बगाटे यांची आहे, तर किरण प्रधान यांनी छायाचित्रण आणि संकलन केले आहे. रंगभूषा सुरेश कुंभार यांनी केली आहे. तर पुण्यातील मोनालिसा आर्ट कलाग्राम येथे याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT