Sandip Jagdale
Sandip Jagdale Sakal
पुणे

सकाळचे बातमीदार संदीप जगदाळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सकाळचे (Sakal) हडपसर (Hadapsar) भागातील बातमीदार (Reporter) संदीप जगदाळे (Sandip Jagdale) यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन (Death) झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. (Sakal Reporter Sandip Jagdale passed away

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजावित होते. बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी हडपसर भागातील अनेक विषय मांडत आवाज उठविला होता. विविध विषयावर सातत्याने पाठपुरावा करून त्या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्या भागातील सामजिक, राजकीय विषयावर ते उत्कृष्टपणे बातमीदारी करत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या जाण्याने विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हडपसरमधील युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या साधना कन्या विद्यालयामधील शिक्षिका सारिका संदीप जगदाळे यांच्या त्या पत्नी होत. संदीप जगदाळे (मुर्टी, ता. बारामती) शेतकरी कुटुंबातील होते. ते शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर ते हडपसर येथे स्थायिक झाले. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमारे 20 दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज (गुरूवार) त्यांचे निधन झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT