Sakal-Vastu Expo
Sakal-Vastu Expo 
पुणे

घरखरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - फ्लॅट पाहा आणि आजच बुक करा. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकारतेय, तेही एकाच ठिकाणी दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांच्या माहितीसह. दसऱ्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा आनंद ! शहराच्या चौफेर असलेल्या या गृहप्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी आणि फ्लॅटचे बुकिंग करण्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला शनिवारी (ता. १३) उद्‌घाटनाच्या दिवशी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 

डी.पी. रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. उद्या (ता. १४) सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना येथे भेट देता येईल. या एक्‍स्पोचे उद्‌घाटन कॅनरा बॅंकेचे सरव्यवस्थापक (सर्कल ऑफिस) संदीप गवारे यांच्या हस्ते झाले. बॅंकेचे उपसरव्यवस्थापक डॉ. आर. के. साहू, स्केपर्सचे विनोद मित्तल, अर्पण चॅटर्जी, भार्गव कुदळेपाटील डेव्हलपर्सचे महेश कोकाटे, संदीप जागडे आदी उपस्थित होते. 

पुणेकरांना दसऱ्याच्या मुहूर्तावर फायद्याचे घर घेण्याची संधी ‘एक्‍स्पो’च्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५० हून अधिक प्रकल्पांची सविस्तर माहितीदेखील शनिवारी दिवसभर पुणेकर जाणून घेत होते. आज रविवारी (ता. १४) देखील नागरिकांना ही संधी मिळणार आहे. 

गृहप्रकल्पांवरील विविध सुविधा, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे फायदे, तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पॉट बुकिंग ऑफर, नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी दिलेल्या सवलतींचा लाभही नागरिक घेत आहेत.

सकाळ वास्तू एक्‍स्पो
रविवार - ता. १४  
स्थळ - महालक्ष्मी लॉन्स, 
डी.पी. रस्ता, कर्वेनगर 
वेळ - सकाळी ११ ते रात्री नऊ

पुणे विभागात बॅंकेच्या २२८ शाखा आहेत. बॅंकेतर्फे गृहकर्ज योजनाही राबविण्यात येते. स्त्रियांकरिता तीस लाखांच्या कर्जास ८.७५ टक्के, तर इतरांसाठी ८.८० टक्के व्याज आकारण्यात येते. जीएसटीची रक्कम त्यातच समाविष्ट असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असून, कोथरूड येथे बॅंकेने ‘रिअल ॲसेट हब’ची व्यवस्था केली आहे. 
- संदीप गवारे, सरव्यवस्थापक, कॅनरा बॅंक 

सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 
- विनोद मित्तल, स्केपर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT