Sakal-Vastu-Expo
Sakal-Vastu-Expo 
पुणे

‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ उद्यापासून

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरखरेदीसाठीचा लोकप्रिय ‘वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. उद्या ता. १६ ते १७ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवस हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर येथे हे एक्‍स्पो चालणार आहे.

‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांमधील आवाक्‍यातील घरे, छोट्या सदनिकांपासून आलिशान पेंट हाऊस, बंगला आदी विविध प्रकारांतील घरांची इत्थंभूत माहिती येथे मिळेल. तसेच गृहप्रकल्पांमधून मिळणाऱ्या सुविधा, लोकेशन, आसपासचा विकसनशील परिसर अशा शंकांचे समाधान करण्यासाठी हा ‘एक्‍स्पो’ मदतीचा ठरणार आहे. या प्रदर्शनात ३० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५०हून अधिक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध असणार आहे. 

ठिकठिकाणी असलेले गृहप्रकल्प, त्यांचे बजेट, त्यामध्ये मिळणाऱ्या सुविधा, कोठे घरांमधील गुंतवणूक अधिक फलदायी ठरू शकते अशा विविध बाबींची माहिती एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे. तसेच ग्राहकांना ‘एक्‍स्पो’मध्ये बांधकाम कंपन्यातर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ मिळू शकणार आहे. तेव्हा भेट द्या अन्‌ बुक करा तुमच्या स्वप्नातील घर.

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो 
  कधी : १६ व १७ फेब्रुवारी 
  कुठे : हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर 
  वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ 
  प्रवेश विनामूल्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT