इंदापुरात दसरा सणा दिवशी १५९ दुचाकी तर ७१ चारचाकी गाड्यांची विक्री
इंदापुरात दसरा सणा दिवशी १५९ दुचाकी तर ७१ चारचाकी गाड्यांची विक्री sakal
पुणे

इंदापुरात दसरा सणा दिवशी १५९ दुचाकी तर ७१ चारचाकी गाड्यांची विक्री

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : भारतीय संस्कृतीत साढेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणा दिवशी इंदापूर बाजार पेठेत ग्राहकांनी प्रथम वाहन, नंतर सोनं तर त्यानंतर कपडे व किराणा खरेदीस प्राधान्य दिले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हळू हळू व्यापार सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला तर बऱ्याच दिवसाने मना

सारखी खरेदी करण्यास मिळाल्याने ग्राहक समाधानी आहेत. मात्र नागरिकांनीखरेदीवेळी मुखपट्टी बांधण्याची स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून सणांचा राजा असलेल्या दिवाळी सणा साठी चांगली खरेदी होईल असा विश्वास व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे.

इंदापूर बाजारपेठेचा कानोसा घेतला असता दसऱ्या दिवशी इंदापूर भरणे ऑटोमोटिव्ह, जय आटोमोटिव्ह व ट्रॅक्टर,सोमाणी ह्युंदाई ,विठ्ठल होंडा,सोनाईबजाज,योगराजटिव्हीएस ,विकास आटोमोबाईल,सिद्धिविनायक ट्रॅक्टर ,सह्याद्री ऑटो,महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह मधून १५९ दुचाकी तर ७१ चारचाकी विकल्या गेल्या. त्यातून सुमारे ५ कोटी ६७ लाख रुपयांची उलाढाल झाली. उलाढाल निश्चित चांगली नाही मात्र दुष्काळात तेरावा महिना तत्वाप्रमाणे किमान उलाढाल सुरू झाल्याने चलनवलन फिरण्यास मदत झाली असून वित्तीय संस्थांचे हफ्ते फेडता येणार असल्याने दिवाळे न निघता दिवाळी चांगली होण्यास मदत होणार आहे.

पहिल्या सणात जावयास सोन्याची अंगठी तसेच ड्रेस मटेरियल द्यायची प्रथा असल्याने अनेकांनी साठवलेल्या पैशातून सोनं व कपडे खरेदीस प्राधान्य दिले. सणा साठी घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी घरी गोड धोड असावे म्हणून गृहिणींनी दिवाळीफराळा साठी प्राथमिक खरेदी केली. मुकुंद शहा, भरत शहा,दादासाहेब मोरे, मेघश्याम पाटील ,आबासाहेब कोकणे, प्रशांत शेटे पाटील, विशाल ढोकरे,प्रकाश खिलारे, संतोष हेंद्रे, पवन राऊत, रविंद्र पवार, विकास करे, राघव ठोंबरे,निखिल नवले,किशोर निंबाळकर ,संतोष चांदगुडे यांनी ही दिवाळी कसोटी बघणारी असल्याचे सांगितले तर दिवाळी खरेदीसाठी शासनाने बँकांना ३ ते ५ टक्के व्याजदराने कर्ज द्यावे अशी मागणी काही नोकरदार नागरिक, शेतकऱ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT