Pune Traffic
Pune Traffic Sakal
पुणे

पुण्याचे नगरनियोजनच गेलंय पाण्यात!

संभाजी पाटील @psambhajisakal

पुणे शहर आणि इथले नियोजन किती पाण्यात आहे, याची झलक वारंवार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नगरनियोजनाची लक्तरेही शब्दशः वाहून नेली.

पुणे शहर आणि इथले नियोजन किती पाण्यात आहे, याची झलक वारंवार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नगरनियोजनाची लक्तरेही शब्दशः वाहून नेली. ना धड रस्ते, ना वाहतुकीचे नियोजन, भर पावसातही पिण्याच्या पाण्याची वणवण. पुण्याला आता सर्व बाबतीत बदलावेच लागेल.

‘औंधच्या ब्रेमेन चौकापासून कोंडी सुरू आहे, ती थेट विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि या कोंडीत चार रुग्णवाहिका अडकल्यात, इंचभर हलायला जागा नाहीये. ‘बकाल’ हा शब्द सुद्धा लाजावा, अशी शहराची अवस्था झालीय.’ अभयसिंह जगताप यांचा काल सायंकाळचा ट्विटरवरचा मेसेज.

प्रसंग दुसरा - ‘सकाळ’ कार्यालयात फोन येतो. कात्रजवरून रोहिदास बोलतोय. ‘ते महापालिकेचे आयुक्त का कोण असतात, त्यांचा नंबर देता का’. कशासाठी फोन हवाय असं विचारताच. ‘आयुक्तांनी फक्त कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशिन चौक ते कात्रज चौकापर्यंत मोटारसायकल चालवून दाखवावी. गावाकडची जमीन विकून एक लाखाचे बक्षीस देईल त्यांना.’

ही आहेत देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहराचे बक्षिस पटकाविलेल्या पुणे शहराच्या दोन भागातील नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया. नागरिकांचा हा संताप, अनावर झालेल्या भावना, काहीच घडत नसल्याने होणारी चिडचिड दररोज वाढत आहे. एका बाजूला नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या या यातना आहेत आणि दुसरीकडे निर्लज्जपणे अनधिकृत फ्लेक्सवर स्वतः ची आरती ओवाळून घेणारे लोकप्रतिनिधी पाहिले की, या पुण्याचे नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न पडतो.

नगरनियोजनाचे शेकडो नियम, कायदे असताना प्रत्यक्षात कशाचेच पालन होते की नाही, असे प्रसंग शहरात वारंवार घडत आहेत. काही तासांमध्ये पडलेल्या ७२ मिलिमीटर पावसाने अनेक रस्त्यांवर पूर यावा अशी परिस्थिती होत असेल तर निश्चितच नियोजन चुकते आहे.

गेल्या महिन्यात ११ सप्टेंबरला झालेल्या पावसाने अशीच दैना उडवून दिली. गरवारे कॉलेजसमोरील मेट्रो स्टेशनखाली पाण्याला बाहेर पडण्यासाठी वाटच नसल्याने कमरेएवढे पाणी साठले. शुक्रवारी झालेल्या पावसाने पुण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या डेक्कन, शिवाजीनगर, कर्वे रोडवर हीच अवस्था झाली. प्रचंड वाहतूक कोंडी त्यात तासनतास भर पावसात अडकलेले पुणेकर यांच्या अवस्थेला निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि निर्ढावलेले प्रशासन जबाबदार आहे. सिमेंटचे रस्ते बांधताना अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्याच टाकलेल्या नाहीत, सहाजिकच पाणी रस्त्यावरून वाहणार आहे. बावधन, कात्रज, पाचगाव पर्वती, बोपदेव घाट अशा शहराच्या चोहोबाजूंच्या टेकड्या प्रचंड पोखरलेल्या आहेत. उपनगरे तसेच नव्याने समाविष्ट गावे, जुनी हद्द या ठिकाणचे नाले, ओढे, ओघळ हे नैसर्गिक स्रोत बुजवून महापालिकेने त्यावर बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात कधीही थोड्या पावसानंतर घरांमध्ये पाणी जाऊ शकते.

पुण्यात सध्या नगरसेवक नसल्याने एकूणच आनंदी आनंद आहे. पण आठ आमदार-खासदार तरी आहेत. वाहतूक, रस्ते यांची एवढी वाईट अवस्था असताना यातील कोणालाच मतदारांबद्दल कणव येऊ नये, ही दुर्दैवी बाब आहे. रस्ते, पावसाळी ड्रेनेज यांची बोगस कामे करणारे ठेकेदार, कोट्यवधी रुपये फी घेऊन चुकीचे सल्ले देणारे सल्लागार, त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी बिनधास्त आहेत, त्या शहराची अवस्था वेगळी काय असणार. जोपर्यंत नागरिक अधिकारी-लोकप्रतिनिधींना रस्त्यावर अडवून जाब विचारणार नाहीत, तोपर्यंत यात बदल होईल, असे वाटत नाही.

हे नक्की करा....

  • प्रत्येक रस्त्याच्या कडेला पावसाळी गटारे

  • निकृष्ट रस्ते करणाऱ्या ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई

  • पावसानंतर पोलिसांसोबत पालिकेची यंत्रणाही हवी रस्त्यावर

  • पालिकेची निवडणूक तातडीने घ्यावी

पुण्यातील वाहने

  • एकूण वाहने : ४३ लाख

  • दररोज रस्त्यावर : ३० ते ३२ लाख

  • पीएमपीच्या दररोज धावणाऱ्या गाड्या : सरासरी १५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT